HomeTallyPrimeWhat's New | Release NotesRelease 3.0 - मराठी

 

Explore Categories

 

 PDF

TallyPrime आणि TallyPrime Edit Log Release 3.0 साठी रिलीज नोट्स | नवीन काय आहे!

Report filter चा वापर करून सुलभ डेटा अॅनॅलीसिस, आपल्या ग्राहकांना payment requests पाठविण्याची सुविधा आणि अधिक चांगला  data management अनुभव, TallyPrime Release 3.0 आपल्याला विविध श्रेणीच्या उपयुक्त फ़िचर्स आणते. इतकेच काय, GST साठी वर्धित फ़िचर्ससह,TallyPrime Release 3.0 तुमच्या GSTR-1, GSTR-2A आणि GSTR-2B चे रीकनसिलेशन सोपे झाले आहे. TallyPrime Release 3.0 चा अनुभव प्रत्येक प्रकारे सोपा आणि आनंददायक आहे.

याशिवाय, Income Tax Computation अहवाल, 2023-24 च्या Finance Budget नुसार, नवीनतम आयकर स्लॅब दरांसह अद्यतनित केलेला आहे.

हिंदी, गुजराती, बंगाली, तेलुगु, मल्याळम, आणि तमिळ भाषेतही रिलीज नोट्स वाचू शकता.

GST

TallyPrime आणि TallyPrime Edit Log Release 3.0 ने आपला GST अनुभव आनंदी आणि आरामदायक बनविला आहे.

प्रॉडक्ट मध्ये तुम्ही आता एकाच कंपनीच्या डेटामध्ये तुमचा एकापेक्षा जास्त GSTIN चा डेटा मेन्टेन करु शकणार अशी व्यव्स्था केलेली आहे, ज्यामुळे आपण कोणत्याही विशिष्ट GST नोंदणी किंवा सर्व GST नोंदणीसाठी ट्रांसॅकशन्स रेकॉर्ड करणे, आणि रिपोर्ट पाहणे शक्य झाले आहे. हे सर्व ट्रांसॅकशन्ससाठी ऑटोमॅटिक टॅक्स लायबिलिटी गणना आणि वर्धित टॅक्स विश्लेषण अनुभवासह जीएसटी व्यवहारांची नोंद करण्याची प्रक्रिया सोपे झाली आहे.

मास्टर्समध्ये GST रेट आणि HSN/SAC डिटेल्स स्वतंत्रपणे स्पेसीफाय करण्याची सुविधा, आणि व्हॅल्यू ओव्हरराइड करण्याचा सोपा अनुभव आपल्यासाठी GST ट्रांसॅकशन्स रेकॉर्ड करणे आणखी सोपे करते.

टॅक्स लायबिलिटी वाढविण्यासाठी आणि इनपुट टॅक्स क्रेडिटचा क्लेम करण्यासाठी, जर्नल व्हाउचर्स तयार करण्याची आवश्यकता नसतानाही आपले GST रिटर्न रिपोर्ट्स ट्रांसॅकशन्स स्पेसीफिक व्हॅल्यूझनुसार अपडेट केले जातील, याची काळजी प्रॉडक्ट घेते. तथापि, आपल्याकडे आवश्यक असल्यास जर्नल व्हाउचर्स रेकॉर्ड करण्याच्या प्रोसेसचे रेकॉर्ड करण्याची फ्लेक्सीबिलिटी आहे.

याशिवाय GSTR-1, GSTR-2A, आणि GSTR-2B चे ट्रांसॅशन्स तुम्ही अगदी सहजतेने रीकंसाइल करू शकता. रीकंसिलेशनसाठी जो  जीएसटी पोर्टलवरून इम्पोर्ट केलेले GST डेटा  जर GST तपशीलांशी जुळत नसल्यास, आपण रिसेट GST सोयीमुळे तो काढून टाकू शकतो. त्यानंतर आपण GST पोर्टल डेटाशी जुळण्यासाठी व्हॅल्यूझ पुन्हा एंटर करू शकता, आणि नंतर ट्रांसॅकशन्सचे रीकंसीलेशन करण्यासाठी पोर्टल डेटा रीइम्पोर्ट करू शकता.

Payment Request

TallyPrime आता पेमेंट रिक्वेस्ट फीचर्ससह येते, जे आपल्याला पेमेंट लिंक्स आणि QR कोड्स (पेमेंट गेटवे किंवा UPI वापरुन) सहजपणे तयार करण्यात आणि शेअर करण्यात मदत करेल. हे फीचर आपल्या पार्टीझना त्वरित आणि सोयीस्कररित्या आपल्यासह पेमेंट्स सेटल करण्यास मदत करते.

Data Exchange and Data Management

त्याव्यतिरिक्त, डेटा एक्सचेंज आवश्यकतेनुसार विशिष्ट किंवा सर्व GST नोंदणीच्या ट्रांसॅकशन्सचे एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट करण्यास सपोर्ट करते.

सर्व नवीन रिपोर्ट फिल्टरच्या मदतीने आपल्याला रिपोर्ट्स मधील आवश्यक डिटेल्सला त्वरित ॲक्सेस मिळू शकतो, अगदी काही क्लीक्स मध्ये ज्यामुळे आपण  आवश्यक असलेली माहिती मिळवू शकता आणि आपल्या बिझिनेसच्या डेटाचे अधिक वेगाने विश्लेषण करू शकता.

मायग्रेशन, रीपेयर आणि इम्पोर्ट यासारख्या डेटा मॅनेजमेंट कार्ये सर्व सुरळीत होतील, कारण आपल्याला प्रोसेसचे स्टेजेस माहित होतील, तर समरी रिपोर्ट प्रारंभ करण्यापूर्वी आणि प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर मास्टर्स आणि व्हाउचर्सबद्दल आपल्याला सूचित करतो. दुसरीकडे, प्रोसेसदरम्यान झालेल्या त्रुटी ओळखणे आणि त्या सोडवणे किंवा दुर करणे करणे हे सर्व सोपे आहे.

जर आपण TallyPrime Edit Log युजर असाल, तर आपण TallyPrime Edit Log Release 3.0 डाऊनलोड करू शकता.

हायलाईट्स  – TallyPrime Release 3.0

एकाच कंपनीत अनेक GST नोंदणी

एका कंपनीच्या डेटामध्ये एकाधिक GST नोंदणीमुळे GST रिटर्न फाइल करण्याचा सोपा अनुभव मिळतो. कारण आपण एका कंपनी डेटाचे GST रिपोर्ट्स वापरून प्रत्येक GST नोंदणीसाठी स्वतंत्रपणे GST रिटर्न दाखल करू शकता. हे आपल्याला वेगवेगळ्या GST नोंदणीसाठी वेगवेगळ्या कंपनीचा डेटा राखण्याच्या त्रासापासून वाचवते. यामुळे, बराच वेळ वाचतो, कारण आपण एकाच कंपनीच्या डेटामध्ये प्रत्येक GST नोंदणीच्या GST रिटर्नची तयारी करण्यासाठी कार्य करू शकता.

आपली सर्व GST नोंदणी एकाच कंपनीत ठेवण्याच्या सुविधेसह, आपण आता हे करू शकता:

  • कंपनीमध्ये GST नोंदणी तयार करा:
    • सर्व GST नोंदणी तपशील जसे की, राज्य, पत्ता प्रकार, नोंदणी प्रकार आणि GSTIN/UIN
    • रिटर्न फाइलिंगची ठराविक मुदत
    • सप्लायची प्लेस
    • e-Invoice आणि e-Way Bill लागू योग्यता
    • रीकंसिलेशन कॉन्फिगरेशन
    • LUT/Bond तपशील, जसे लागू असेल तसे
    • GST नोंदणीशी संबंधित इतर तपशील
  • यानुसार ट्रांसॅकशन्सची नोंद करा:
    • GST नियम विशिष्ट GST नोंदणीवर लागू होतात.
    • GST नोंदणीसाठी प्रदान केलेली माहिती, जसे की GSTIN/UIN आणि पत्ता.
  • परस्परविरोधी व्हाउचर नंबर्स टाळण्यासाठी प्रत्येक GST नोंदणीसाठी व्हाउचर सिरीझ तयार करा.
  • आपल्या त्वरित संदर्भासाठी अधिक वेगाने डिस्प्ले होणारे GST रिटर्न रिपोर्ट्स उघडा.
  • आवश्यकतेनुसार विशिष्ट GST नोंदणी किंवा सर्व नोंदणीसाठी GST रिटर्न्स एक्सपोर्ट करा.
  • ई-इंव्हॉईस आणि ई-वे बिल कार्यासाठी लॉग इन करण्यासाठी विशिष्ट GST नोंदणीच्या क्रेडेंशियल्सचा वापर करा.

याव्यतिरिक्त, ससपेन्शन किंवा सरेंडर झाल्यास आपण विशिष्ट GST नोंदणी निष्क्रिय करू शकता. आणि जेव्हा आवश्यक असेल, तेव्हा GST नोंदणी पुन्हा सक्रिय करण्याची फ्लेक्सीबिलिटी आपल्याकडे आहे.

अधिक जाणून घेण्यासाठी,  Getting Started with GST in TallyPrime विषयाचा संदर्भ Enable GST for Your Company – Single and Multi-Registration या  विभागातून घ्या, किंवा How to Use Multiple GST Registrations Feature in TallyPrime व्हिडिओ बघा.

आपण TallyPrime मध्ये विविध GST नोंदणी असलेल्या कंपनिजचे मर्जर देखील सहजपणे करू शकता.

ते कसे करावे? हे जाणून घेण्यासाठी, How to Merge Companies with Different GSTIN/UINs in TallyPrime Release 3.0 or Later व्हिडिओ पहा, किंवा Merge Companies with Different GSTINs विषयाचा संदर्भ घ्या.

GST तपशील स्पेसीफाय करणे

आपल्याकडे आता आवश्यकतेनुसार विविध प्रकारच्या मास्टर्समध्ये GST रेट आणि HSN/SAC शी संबंधित तपशील स्वतंत्रपणे स्पेसीफाय आणि अपडेट करण्याची फ्लेक्सीबिलिटी आहे. एखाद्या पार्टीचे GST नोंदणी तपशील अपडेट करणे देखील सोपे झाले आहे. याव्यतिरिक्त, आपण कोणत्याही मास्टरमध्ये मग ते स्टॉक आयटम, स्टॉक ग्रुप, लेजर किंवा ग्रुप असो स्लॅब रेट्स आवश्यकतेनुसार स्पेसीफाय करू शकता.

GST दर आणि HSN/SAC तपशील

GST दर आणि HSN/SAC तपशील एंटर करणे सोपे झाले आहे, कारण आपण आपल्या आवश्यकतेनुसार ते तपशील स्वतंत्र मास्टर्समध्ये एंटर करू शकता. दुसरीकडे, व्हाउचर निर्मिती दरम्यान तपशील ओव्हरराइड करण्याची सुविधा मोठी फ्लेक्सीबिलिटी प्रदान करते.

अधिक जाणून घेण्यासाठी, How to Set Up GST Rate Details at Different Levels in TallyPrime आणि How to Configure Ledgers for GST in TallyPrime हे व्हिडिओ पहा  .

आता तुम्ही करू शकता:

  • F11 Company features अंतर्गत GST रेट आणि HSN/SAC तपशीलांचे सोर्स सेट करा. त्यानंतर, जेव्हा आपण व्हाउचर तयार करता, तेव्हा GST रेट आणि HSN/SAC तपशील F11 Company features अंतर्गत सेट केलेल्या सोर्समधून विचारात घेतले जातील.
  • एका मास्टरमध्ये GST रेट तपशील अपडेट करणे निवडा (जसे की, स्टॉक ग्रुप) आणि HSN/SAC तपशील दुसऱ्या मास्टरमध्ये (जसे की, स्टॉक आयटम).
  • GST आणि HSN/SAC तपशील इतर कोणत्याही मास्टरमध्ये किंवा व्हाउचर क्रिएशन दरम्यान ओव्हरराइड करा.

अधिक जाणून घेण्यासाठी, Getting Started with GST in TallyPrime विषयात  Set Up GST Rates and HSN/SAC Details विभागाचा संदर्भ घ्या.

GST नोंदणी तपशील

आता आपण मास्टर्समध्ये नोंदणीसाठी GST नोंदणी तपशील (जसे की, GSTIN आणि नोंदणी प्रकार) आणि मेलिंग तपशील (जसे की, पत्ता, राज्य किंवा देश) अशा प्रकारे अपडेट करू शकता की यावर कोणताही परिणाम होणार नाही:

  • आधी नोंदवलेले ट्रांसॅकशन्स.
  • मागील महिन्यांमध्ये फाइल केलेले रिटर्न्स.

इतकेच काय, GST नोंदणी तपशिलातील अपडेट्सचा इतिहास तपासण्यासाठी नव्याने सुरू केलेल्या सुविधेसह, आपण आता जाणून घेऊ शकता:

  • GST नोंदणी तपशीलातील अपडेट्सचे स्वरूप
  • कुठल्या तारखेला अपडेट्स करण्यात आले होते

अधिक जाणून घेण्यासाठी, Getting Started with GST in TallyPrime या विषयात  Update GST Details in Party Ledgers विभागाचा संदर्भ घ्या, किंवा How to Update Party GST Registration in TallyPrime Without Affecting Earlier Returns  व्हिडिओ पहा.

मास्टर्स मध्ये स्लॅब रेट

वेगवेगळ्या रकमेच्या स्लॅबसाठी वेगवेगळे GST दर असलेल्या आयटम्स किंवा सर्विसेससाठी, आपण आता केवळ स्टॉक आयटम्समध्येच नव्हे तर आवश्यकतेनुसार स्टॉक ग्रुप, लेजर आणि  कंपनीमध्ये देखील स्लॅब रेट्स स्पेसीफाय करू शकता.

अधिक जाणून घेण्यासाठी, How to Specify Slab-Based GST Rate Details in Masters in TallyPrime व्हिडिओ पहा.

GST ट्रांसॅकशन्स

ट्रांसॅकशन्समध्ये टॅक्स कॅलक्युलेशन करणे सोपे झाले आहे, कारण TallyPrime संबंधित मास्टर्समध्ये प्रदान केलेले GST रेट आणि HSN/SAC तपशील विचारात घेते, तर आपण आवश्यकतेनुसार व्हाउचर निर्मिती दरम्यान तपशील ओव्हरराइड करू शकता.

TallyPrime Release 3.0 सह, आपण खालील दिलेल्या अॅक्टिविटीज करू शकता:

  • जेव्हा आपण एकाच कंपनीत एकाधिक GST नोंदणी मेंटेन करता, तेव्हा कोणत्याही GST नोंदणीसाठी ट्रांसॅकशन्स रेकॉर्ड करा.
  • प्रत्येक लेजरसाठी तसे करण्याऐवजी व्हाउचरमध्ये ट्रांजॅकशनचे नेचर सेट करा.
  • ट्रांसॅकशन्स मध्ये GST रेट आणि HSN/SAC कोड मोठ्या सहजतेने ओव्हरराइड करा.
  • ट्रांजॅकशनची GST स्टेट्स आवश्यकतेनुसार रीकंसाइल्ड, अनरीकंसाइल्ड, मिसमॅच्ड किंवा एक्सक्लूडेड करू शकता. GSTR-2A रीकंसाइल्ड रिपोर्ट मध्ये आपण एकाधिक ट्रांसॅकशन्ससाठी देखील असे करू शकता.
  • केवळ रिटर्न इफेक्टिव्ह डेट बदलून व्हाउचर वेगळ्या रिटर्न पीरियडमध्ये मुव्ह करा. आपण GSTR-1, GSTR-3B, आणि GSTR-2A रीकंसिलेशन यासारख्या GST रिटर्न रिपोर्ट्स मधील एकाधिक ट्रांसॅकशन्ससाठी देखील हे करू शकता.
  • साइन केले म्हणून रिटर्न मार्क करा. जेणेकरून आपण रिटर्नवर साइन केल्यानंतर केलेल्या कोणतेही बदल केल्यास ट्रॅक करू शकता. अधिक जाणून घेण्यासाठी,View GST Details in GSTR-1 विषयासाठी यातील Sign GSTR-1 विभागात बघा, आणि View GST Details in GSTR-3B या विषयातील Sign GSTR-3B  विभागात बघा.
  • रिटर्न इफेक्टिव्ह डेट प्रदान करून भविष्यातील रिटर्न पीरियड साठी व्हाउचरमध्ये सुधारणा करा. अधिक जाणून घेण्यासाठी, GST Amendments in TallyPrime हा विषय पहा.
  • स्टॅच्युटरी अॅडजस्टमेंट्ससाठी विविध पर्यायांमधून निवड करून GST अॅडजस्टमेंट्स करा, जे आपल्या बिझिनेस परिस्थिती आणि पद्धतींचा बराचसा समावेश करतात. स्टॅच्युटरी अॅडजस्टमेंट्ससाठी प्रदान केलेल्या पर्यायांमध्ये टॅक्स लायबिलिटी मध्ये इंक्रीझ, इनपुट टॅक्स क्रेडिट मध्ये इंक्रीझ, टॅक्स लायबिलिटी आणि इनपुट टॅक्स क्रेडिट मध्ये वाढ आणि इतर गोष्टींचा समावेश आहे.
  • GST रजिस्ट्रेशन तपशील मास्टर कडून ट्रांजॅकशन मध्ये अखंडपणे कॉपी करा. GST नोंदणी तपशीलांमध्ये हे समाविष्ट आहे:
    • कंपनी GST रजिस्ट्रेशन तपशील (एडिट करण्यायोग्य नाही)
    • पार्टी GST रजिस्ट्रेशन तपशील
    • टॅक्स रेट तपशील
    • HSN/SAC तपशील
    • इनक्लुड इन असेसेबल व्हॅल्यू ची सेटिंग.
  • जसा पोर्टलवर दिसतो तसा हुबहु, GST, e-Invoice, आणि व्हाउचरचा e-Way Bill डेटा पहा.

वर नमूद केलेल्या सुविधांव्यतिरिक्त, आपण हे देखील करू शकता:

  • मटेरियल इन आणि मटेरियल आउट व्हाउचर्समध्ये GST कॅलक्युलेट करा. अधिक जाणून घेण्यासाठी, Record a Material In Voucher Under GST in TallyPrime विषय बघा.
  • परचेस व्हाउचरमध्ये टॅक्स अॅनॅलिसिस पहा. अधिक जाणून घेण्यासाठी, Local and Interstate Purchase of Goods and Services हा विषय बघा.
  • देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पुरवठादारांसाठी सप्लायची प्लेस निवडा.

इतकेच काय, जर आपण GST रिटर्न्स वर परिणाम करणारे व्हॅल्यू बदलली, तर TallyPrime आपल्याला व्हाउचर पुन्हा-सेव्ह करताना सूचित करेल, जेणेकरून आपण खालीलपैकी एक निर्णय घेऊ शकाल:

  • व्हॅल्यूझमधील फरक स्वीकारा आणि नंतर मिसमॅच दूर करा.
  • व्हॅल्यूझमधील फरक स्वीकारा, त्याचवेळेस व्हाउचर मिसमॅच्ड मानले जाणार नाही, याची खात्री करा.
  • गरज पडल्यास व्हाउचरवर परत जा, आणि मूळ व्हॅल्यू परत आणा.

व्हाउचर टाइपसाठी डिफॉल्ट जीएसटी रजिस्ट्रेशन

एकाधिक GST रजिस्ट्रेशनच्या बाबतीत, आपण विशिष्ट व्हाउचर टाइपसाठी डिफॉल्ट GST रजिस्ट्रेशन सेट करू शकता.

उदाहरणार्थ, जर आपण एखाद्या विशिष्ट कार्यालय किंवा लोकेशनसाठी सर्व जर्नल व्हाउचर्स रेकॉर्ड केले, तर आपण व्हाउचर टाइप मध्ये त्या लोकेशनचे GST रजिस्ट्रेशन डिफॉल्ट म्हणून सेट करू शकता.

त्यानंतर, जेव्हा आपण व्हाउचर तयार करता, तेव्हा डिफॉल्ट GST रजिस्ट्रेशन व्हाउचर टाइप मध्ये निवडलेले असेल, ज्यामुळे GST रजिस्ट्रेशन दरम्यान स्विच करण्यासाठी लागणारा वेळ वाचेल.

ऑटोमॅटिक किंवा मल्टी-युजर ऑटो साठी ओरिजिनल व्हाउचर नंबर्स रिटेन करणे

व्हाउचर नंबरिंगच्या ऑटोमॅटिक किंवा मल्टी-युजर ऑटो पद्धतीसह व्हाउचर टाइप्ससाठी, TallyPrime व्हाउचर इन्सरशन किंवा डिलिशनच्या बाबतीत मूळ व्हाउचर नंबर रिटेन करते.

हे सुनिश्चित करते की, इन्सरशन किंवा डिलिशन नंतरही ट्रांसॅकशन्सचे व्हाउचर नंबर्स जुनेच राहतील आणि बदलणार नाहीत.

तथापि, आपण आपल्या बिझिनेसमध्ये ही पद्धत वापरल्यास आपण व्हाउचर इन्सरशन किंवा डिलिशनच्या वेळी व्हाउचरला रीनंबर करणे निवडू शकता.

अधिक जाणून घेण्यासाठी, Voucher Numbering Behavior in TallyPrime मधील व्हिडिओ बघा.

विशिष्ट GST रजिस्ट्रेशनसाठी व्हाउचर सीरिज

एकाधिक GST रजिस्ट्रेशन्स असलेल्या कंपन्यांसाठी, आपण प्रत्येक रजिस्ट्रेशन आणि व्हाउचर टाइप साठी व्हाउचर नंबरिंग सिरीज तयार करू शकता, जेणेकरून आपल्या डेटामध्ये आणि रिटर्न्स मध्ये समान व्हाउचर नंबरचा गोंधळ होणार नाही.

अधिक जाणून घेण्यासाठी, Create Voucher Numbering Series section in the Getting Started with GST in TallyPrime हा विषय बघा.

GST रिटर्न्स

TallyPrime Release 3.0 आपल्या त्वरित संदर्भासाठी GST रिटर्न्स अधिक वेगाने उघडण्यास मदत करते. शिवाय, GSTR-1 आणि GSTR-3B सारख्या जीएसटी रिपोर्ट्स मध्ये वाढ केल्यामुळे GST रिटर्न्स फाइल करणे सोपे होते, जेणेकरून आपण सहजपणे हे करू शकता:

  • आवश्यकतेनुसार विशिष्ट GST रजिस्ट्रेशन किंवा सर्व GST रजिस्ट्रेशन्ससाठी, GST रिटर्न्स पाहणे.
  • ट्रॅक जीएसटी रिटर्न अॅक्टिव्हिटीज रिपोर्टचा वापर करून सर्व पिरीयड्समधील रिटर्न फाइल करण्यासाठी पेंडिंग असलेल्या सर्व कार्यांचा मागोवा घेणे.

अधिक जाणून घेण्यासाठी, Track GST Return Activities विषयाचा संदर्भ घ्या, किंवा How to Use Track GST Return Activities Report in TallyPrime to Track Activities Related to Returns चा व्हिडिओ पहा.

  • अनसर्टन ट्रांसॅकशन्स अधिक सुलभतेने सोडवा.
  • टॅक्स-संबंधित व्हॅल्यूझमध्ये मिसमॅच असूनही ट्रांसॅकशन्स जसेच्या तसे स्वीकारा, आणि वॅलीड रिपोर्ट अॅझ अॅकसप्टेड ट्रांसॅकशन्सचा वापर करून संबंधित रिपोर्ट मधून असे ट्रांसॅकशन्स शोधा.
    अधिक जाणून घेण्यासाठी, How to Use Transactions Accepted as Valid Report in TallyPrime हा व्हिडिओ पहा.
  • जर आपण काही ट्रांसॅकशन्स वेगळ्या रिटर्न पिरीयड मध्ये हलवू इच्छित असाल, तर एकापेक्षा जास्त ट्रांसॅकशन्ससाठी रिटर्न इफेक्टिव्ह डेट सेट करा.
  • आवश्यक असल्यास न्यू रिटर्न इफेक्टिव्ह डेट सह साइन्ड रिटर्न मधून ट्रांजॅकशन आमेंड करा. अधिक जाणून घेण्यासाठी, GST Amendments in TallyPrime हा विषय पहा.
  • एक्सपोर्ट केल्यानंतर सुधारित किंवा डिलीट केलेले ट्रांसॅकशन्स ओळखा.
  • ट्रॅक GST रिटर्न अॅक्टिव्हिटीज रिपोर्ट पहा:
    • आपले अनसर्टन ट्रांसॅकशन्स, एक्सपोर्ट आणि साइनिंग यासारख्या पेंडिंग कार्य ओळखा.
    • कार्य पूर्ण करण्यासाठी अॅक्शन घ्या, जेणेकरून आपण वेळेत रिटर्न फाइल करू शकाल.
  • नोंदवलेले ट्रांसॅकशन्स आणि करावयाच्या अॅक्शन्सच्या आधारे दिसणाऱ्या संबंधित विभागांसह अपडेट झालेला रिपोर्ट पहा.
  • सर्व पिरीयड्स मधील पेंडिंग कामे ओळखा, जी एम्बर रंगामध्ये हायलाइट केली जातील.
  • एक्सपोर्ट करावयाच्या रिटर्नच्या माहितीचे रिवीव्ह करण्यासाठी प्रीविव्ह रिपोर्ट पहा.
  • आवश्यकतेनुसार विशिष्ट GST रजिस्ट्रेशन किंवा सर्व रजिस्ट्रेशन्ससाठी एक्सपोर्ट GST रिटर्न्स करा. आपण टॉप मेन्यू अंतर्गत एक्सचेंजवरून असे करू शकता:
    • एकाधिक GST रजिस्ट्रेशन्सच्या बाबतीत सर्व GST रजिस्ट्रेशन्स किंवा विशिष्ट GST रजिस्ट्रेशन्सच्यासाठी.
    • आवश्यकतेनुसार विभागनिहाय JSON फाइल्ससह.
    • आपल्या आवडीच्या फॉरमॅटमध्ये – JSON, MS Excel, किंवा CSV.
    • MS Excel मध्ये GSTR-3B डेटासह. हे GST पोर्टलवरील Excel युटिलिटीसारखेच आहे, ज्यामुळे GSTR-3B भरणे सोपे होते. अधिक जाणून घेण्यासाठी, File GSTR-1 आणि  File GSTR-3B हा विषय बघा  किंवा How to Export GSTR-1 and GSTR-3B Using TallyPrime हा व्हिडिओ पहा.

GSTR-1, GSTR-2A, आणि GSTR-2B मधील ट्रांसॅकशन्स रीकंसाइल करा

GSTR-1, GSTR-2A, आणि GSTR-2B मधील आपले ट्रांसॅकशन्स आपल्या सप्लायर्सच्या ट्रांसॅकशन्सशी रीकंसाइल करण्याचा अनुभव अधिक सोपा झाला आहे. हे सुनिश्चित करते की, आपल्या बुक्स मधील माहिती GST पोर्टलवरील माहितीशी जुळते आहे की नाही. शिवाय, आपल्या बुक्स मधील  अनरीकंसाइल्ड ट्रांसॅकशन्सशी संभाव्य मॅचेसच्या  ओळखण्याची सुविधा रीकंसिलेशन प्रोसेसच्या सुलभतेत भर घालते.

आता तुम्ही करू शकता:

GSTR-1, GSTR-2A, आणि GSTR-2B साठी JSON फाइल्स इम्पोर्ट करणे.

  • रीकंसाइल ट्रांसॅकशन्स:
    • GST पोर्टलवरून डाऊनलोड केलेले ट्रांसॅकशन्स इम्पोर्ट केल्यानंतर.

रिटर्न इफेक्टिव्ह डेट अपडेट करून ट्रांसॅकशन्स वेगळ्या रिटर्न पिरीयड मध्ये असले तरीही आपण असे करू शकता.

  • मिसमॅचची मर्यादा स्पेसीफाय करून.
  • GSTR-2A आणि GSTR-2B मधील डॉक्युमेंट नं. शून्य किंवा विशेष कॅरेक्टर्सच्या प्रीफिक्सकडे दुर्लक्ष करून.
  • GSTR-2A आणि GSTR-2B मध्ये रीकंसिलेशनसाठी दुर्लक्ष करून डॉक्युमेंट नं. किंवा इंव्हॉईस नं. मध्ये एखाद्या पार्टीने वापरलेले प्रीफिक्स कॉन्फिगर करून.
  • आवश्यकतेनुसार ट्रांसॅकशन्स स्टेट्स रीकंसाइल्ड किंवा मिसमॅच म्हणून मॅन्युअली मार्क करा.
  • सप्लायर्स इंव्हॉईस नंबरचा आणि डेट आणि GSTR-2A आणि GSTR-2B मध्ये रीकंसिलेशन डेट यांना डॉक्युमेंट नंबर असे समजा.
  • GSTR-2B मध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट अनुपलब्धतेचे कारण ओळखा.

इतकेच नाही तर, पोर्टलवर असलेल्या ट्रांसॅकशन्ससाठी आणि बुक्समध्ये नसलेले किंवा त्याउलट असलेल्या परिस्थितीत, TallyPrime आपल्याला मॅचिंग व्हॅल्यूझ परंतु भिन्न डॉक्युमेंट नंबर, पार्टी GSTIN/UINs किंवा रिटर्नचे विभाग  ओळखण्यास मदत करते. हे आपल्याला ट्रांसॅकशन्स वेगाने रीकंसाइल करण्यास मदत करते.

अधिक जाणून घेण्यासाठी Reconcile GSTR-1 Data, Reconcile GSTR-2A Data, and Reconcile GSTR-2B Data हे विषय बघा.

रिपोर्ट फिल्टरसह बिझिनेस माहितीची  त्वरित ऍक्सेस

फिल्टर्स लागू करण्यासाठी व्हर्साटाइल सुविधेसह आवश्यक माहिती आणि डेटा अनॅलिसिस शोधणे अधिक वेगवान, सोपे आणि आनंददायक झाले आहे, ते म्हणजे:

  • सहज शोधता येण्याजोगे
  • फक्त एका क्लिकवर उपलब्ध
  • बिझिनेस परिस्थितीची व्याप्ती कव्हर करण्यासाठी एनहॅन्स झालेले

एका रिपोर्ट मध्ये, आपण आता हे करू शकता:

  • आवश्यकतेनुसार ट्रांसॅकशन्स किंवा मास्टर मधील सर्व फिलड्स किंवा विशिष्ट फिलड्स मधील माहिती शोधा. आपण ट्रांसॅकशन्स आणि मास्टर्स मध्ये उपलब्ध असलेल्या फिलड्सची संपूर्ण श्रेणी शोधू शकता जसे की:
    • GST तपशील जसे की, GSTIN/UIN, GST, GST रेट्स, HSN/SAC.
    • सप्लीमेंटरी डिटेल्स फिलड्स.
    • ई-वे बिल आणि ई-इंव्हॉईस संबंधित फिलड्स.
  • आवश्यक माहितीची विशिष्टता आणि कॉम्प्लेक्सिटी यावर आधारित खालील प्रकारच्या फिल्टरमधून निवडा:
    • बेसिक फिल्टर, जे क्विक सर्च इंजिनसारखे काम करते.
    • मल्टी-फिल्टर, जे आपल्याला माहिती शोधण्यासाठी एकापेक्षा जास्त शोध निकष जोडण्यास मदत करते.
    • अॅडवांस्ड फिल्टर, जे आपल्याला मास्टर्स आणि ट्रांसॅकशन्स दोन्हीमधील माहिती शोधण्यासाठी शोध निकष जोडण्यास मदत करते.
  • रिपोर्ट मध्ये लागू केलेल्या फिल्टरबद्दल जाणून घेण्यासाठी फक्त एका क्लिकवर फिल्टर डिटेल्स पहा.
  • आपल्या संस्थेतील वापराच्या फ्रीक्वेनसी अनुसार कोणत्याही रिपोर्ट मध्ये लागू करण्यासाठी डिफॉल्ट फिल्टर निवडा.

इतकेच काय, आपण फिल्टर्स लागू केलेल्या रिपोर्टचा विव्ह सेव्ह करू शकता, आणि फिल्टर केलेल्या माहितीचा त्वरित संदर्भ घेऊ शकता.

अधिक जाणून घेण्यासाठी, Apply Filter in Reports in TallyPrime हा विषय बघा, किंवा How to Apply Filters to Reports in TallyPrime to Find Information Quickly हा व्हिडिओ पहा.

पेमेंट रिक्वेस्ट

TallyPrime आता पेमेंट रिक्वेस्ट फीचरसह येते जे आपल्याला पेमेंट लिंक्स आणि QR कोड्स (पेमेंट गेटवे किंवा UPI वापरुन) क्षणार्धात तयार, आणि शेअर करण्यात मदत करेल. हे आपल्या पार्टीझना त्वरित आणि सोयीस्कररित्या आपल्यासह पेमेंट्स सेटल करण्यास मदत करेल.

पेमेंट रिक्वेस्ट खालील फीचर्ससह येते आणि बरेच काही:

  • इन्स्टंट पेमेंट रिक्वेस्ट: एकदा आपण आपला सेटअप पूर्ण केल्यावर, टॅलीप्राइम आपल्याला त्वरित पेमेंट लिंक आणि QR कोड्स तयार करण्यात आणि पाठविण्यात मदत करेल. हे सर्व आपल्या नियमित बिझिनेसच्या चालू असताना केले जाते!

आम्ही समजु शकतो  की, आपल्या बिझिनेस पेमेंटच्या संदर्भात विशेष आवश्यकता असू शकतात आणि त्यानुसार,
 TallyPrime आपल्याला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी खूप फ्लेक्सीबिलिटी प्रदान करते.

  • सिमलेस रीकंसिलेशन: TallyPrime आपल्या सर्व पेमेंट रिक्वेस्टचे रीकंसिलेशन सुलभ करून गोष्टी अधिकच सोप्या करते.

पेमेंट रीकंसिलेशन रिपोर्ट आपल्याला अनरीकंसाइल्ड तसेच रीकंसाइल्ड झालेल्या ट्रांसॅकशन्सचा सुस्पष्ट समरी प्रदान करेल.

  • डेटा सेक्युरिटी: आम्ही समजु शकतो, आपल्या आर्थिक डेटाची सुरक्षितता आपल्या बिझिनेससाठी सर्वोच्च आहे, आणि आपला डेटा पूर्णपणे सुरक्षित राहील, याची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वोच्च उपाययोजना केल्या आहेत.

आम्ही आपल्याला सर्वोत्कृष्ट सेक्युरिटी पॉलिसीझ प्रदान करण्यासाठी प्रमुख पेमेंट गेटवेसह भागीदारी केली आहे, आणि आपली पेमेंट्स सुरक्षित हातात आहेत, याची खात्री आपणास द्यायची आहे.

अधिक जाणून घेण्यासाठी Payment Request in TallyPrime विषय बघा.

एनहॅन्स केलेला डेटा मॅनेजमेंट अनुभव

सुधारित डेटा मॅनेजमेंट सुविधा केवळ रिलीजकडे मायग्रेशन सुरळीत आहे याची खात्री करत नाही, तर मायग्रेशन, रीपेयर, इम्पोर्ट आणि सिंक्रोनायझेशनमध्ये एनहॅन्सड साधेपणासह आपल्याला आनंदित करतात. आपण कार्याची प्रगती तपशीलवार पाहू शकता, आणि अपवाद असल्यास त्यांचे निराकरण करू शकता.

सुधारित मायग्रेशन आणि रीपेयर अनुभव

मायग्रेशन आणि रीपेयरचे स्टेट्स  

एखाद्या कंपनीचे मायग्रेशन किंवा रीपेयर करण्याची आवश्यकता असल्यास कंपन्यांचे स्टेट्स आपल्याला त्वरित कळवले जाइल.

मायग्रेशन आणि रीपेयरची प्रगती

मास्टर्स आणि ट्रांसॅकशन्सच्या पडताळणीपासून ते आपल्या डेटाचे यशस्वी मायग्रेशन किंवा रीपेयरपर्यंत, एनहॅनस्ड प्रोसेस आपल्याला प्रगतीची माहिती देते.

मायग्रेशन आणि रीपेयरचा समरी पहा

डेटा मायग्रेशन किंवा रीपेयरच्या शेवटी, आपण प्रोसेस पूर्ण होण्यापूर्वी आणि नंतर एकूण व्हाउचर्स आणि मास्टर्ससह समरी पाहू शकता. हे आपल्याला प्रोसेसदरम्यान डेटा चे नुकसान झाले आहे की नाही, हे जाणून घेण्यास मदत करते.

अधिक जाणून घेण्यासाठी, Migrate Company Data and Repair Company Data हे विषय पहा, किंवा How to Migrate Company Data to TallyPrime Release 3.0 हा व्हिडिओ पहा.

प्रोसेसदरम्यान झालेल्या एरर्स पहा, आणि त्या दुरुस्त करा मायग्रेशन, रीपेयर, इम्पोर्ट किंवा सिंक्रोनायझेशनच्या शेवटी, आपण सहजपणे हे करू शकता:

  • प्रोसेसदरम्यान घडलेले एक्ससेपशन्स ओळखा.
  • लागू होईल तसे एका वेळी एक किंवा अधिक एक्ससेपशन्स व्यवस्थित करा.

इतकेच काय, आपल्या सोयीनुसार प्रोसेसच्या शेवटी किंवा नंतर अपवाद सोडविण्याची फ्लेक्सीबिलिटी आपल्याकडे आहे.

अधिक जाणून घेण्यासाठी, Data Exceptions & Resolutions in TallyPrime या विषयाचा संदर्भ घ्या, किंवा How to Resolve Exceptions During Import, Repair, Migration, and Synchronisation in TallyPrime व्हिडिओ पहा.

GSTN डेटा रीसेट करा

जेव्हा आपला इम्पोर्ट केलेला GSTN डेटा करप्ट होतो, किंवा डेटा चुकून इम्पोर्ट केला जातो, तेव्हा यामुळे रीकंसिलेशन समस्या उद्भवू शकतात.

तथापि, TallyPrime आता आपल्याला इम्पोर्ट केलेला GSTN डेटा रीसेट करण्याची सुविधा प्रदान करते, जे आपला बुक डेटा आहे तसाच ठेवून करप्ट GSTN डेटा मिटवून टाकेल.

त्यानंतर, आपण पोर्टलवरून डाउनलोड केलेली GSTR-1 किंवा GSTR-2A ची JSON फाइल पुन्हा इम्पोर्ट करू शकता, आणि आपल्या ट्रांसॅकशन्सची रीकंसिलेशन सुरू ठेवू शकता.

एकाच स्क्रीनवर अनेक कंपन्यांना कनेक्ट किंवा डिस्कनेक्ट करा

आता आपण एकाच स्क्रीनचा वापर करून ऑनलाइन अॅक्सेससाठी अनेक कंपन्यांना कनेक्ट किंवा डिस्कनेक्ट करू शकता, ज्यामुळे एक-एक करून कंपन्या निवडण्यात लागणारा वेळ वाचतो.

हे विशेषत: अशा बिझिनेससाठी ज्यांच्याकडे एकाधिक कंपन्या आहेत त्यांना उपयुक्त आहे. ज्यांना आपल्याला रिमोट वर्किंग, सिंक्रोनायझेशन किंवा ब्राउझर अॅक्सेससाठी ऑनलाइन कनेक्ट करण्याची आवश्यकता असू शकते.

अधिक जाणून घेण्यासाठी, Remote Access in TallyPrime विषयातील Connect Companies to Tally.NET services हा विभाग बघा.

New Tax Regime

Finance Budget 2023-24 नुसार, new tax regime निवडलेल्या employees साठी income tax slab rates लागू केले आहेत.

TallyPrime मध्ये, Income Tax Computation report, Annexure II to 24Q, आणि फॉर्म-16 खालील गोष्टींसह अद्यतनित केले आहेत:

  • नवीनतम income tax slab rates
  • Standard deduction, जसे लागू असतील तसे
  • ₹ 7 लाख पेक्षा कमी किंवा समान taxable income असलेल्या employees ना Rebate u/s 87A अंतर्गत सूट.
  • ₹ 5 कोटी पेक्षा जास्त taxable income असलेल्या employees साठी surcharge rate 25% कमी.
  • ₹ 7 लाख पेक्षा जास्त करपात्र उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी Marginal tax relief 27,777 किंवा कमी.

इतकेच काय, regular tax regime असलेल्या employees साठी, tax गणनेच्या चांगल्या स्पष्टतेसाठी आणि समजून घेण्यासाठी taxable income slabs निश्चित मूल्यांसह अद्यतनित केले जातात.

प्रॉडक्ट सुधारणा – TallyPrime Release 3.0

परचेस व्हाउचर्स साठी टॅक्स अनालिसिस (कंपोझिशन डीलर्स)

कंपोझिशन डीलर्ससाठी, टॅक्स अॅनॅलिसिस आता परचेस व्हाउचर्समध्ये उपलब्ध आहे.

ऑटोमॅटिक (मॅन्युअल ओव्हरराइड) साठी शेवटचा व्हाउचर नंबर बदलणे

ऑटोमॅटिक (मॅन्युअल ओव्हरराइड) व्हाउचर नंबरिंग पद्धतीच्या बाबतीत, जेव्हा आपण व्हाउचर ऑप्शनल केले किंवा डिलीट केले, तेव्हा नंतरच्या व्हाउचरला ऑप्शनल किंवा डिलिट केलेल्या व्हाउचरच्या नंबरनुसार नंबर देण्यात येतात.

आता आपण सहजपणे नंबरिंग तपशील सेट किंवा बदलू शकता, आणि शेवटचा एंटर केलेला व्हाउचर नंबर बदलू शकता, जेणेकरून भविष्यातील व्हाउचर्स त्याप्रमाणे क्रमांकित केले जातील.

डुप्लिकेट व्हाउचर नंबर किंवा सप्लायर इंव्हॉईस नंबर असलेले व्हाउचर्स ओळखणे

डुप्लिकेट व्हाउचर नंबर्स किंवा सप्लायर इनव्हॉइस नंबर्स असलेले सर्व व्हाउचर आता अनसर्टन ट्रांसॅकशन्स (करेक्शन निडेड) विभागात डुप्लिकेट व्हाउचर नंबर्स  अंतर्गत ओळखले जाऊ शकतात.

त्यानंतर रिटर्न फाइल करण्यापूर्वी आपण आवश्यक त्या सुधारणा करू शकता.

व्हाउचर नंबर आणि रेफरन्स नंबर मधील बदल

जेव्हा आपण व्हाउचरची तारीख बदलली, तेव्हा व्हाउचर नं. आणि रेफरन्स नं. मध्येही बदल करण्यात आला.

जेव्हा आपली व्हाउचर नंबरिंगची पद्धत ऑटोमॅटिक किंवा मल्टी युजर ऑटो असेल, तेव्हा आता आपल्याकडे व्हाउचर नंबर रिटेन करण्याची सुविधा आहे.

अनरजिस्टरर्ड डिलर्सकडून ऍडव्हान्स रीसीप्ट ट्रॅक करणे  

GSTR-1 आणि GSTR-3B मध्ये आपण अनरजिस्टरर्ड डिलर्स किंवा ग्राहकांकडून अॅडवांस रीसीप्ट ट्रॅक करू शकत नाही.

हा प्रश्न सुटला आहे.

विशिष्ट परचेस व्हाउचर्स मध्ये सप्लायची प्लेस

आता आपण परचेस व्हाउचर्समध्ये सप्लायची प्लेस जोडू शकता जसे की:

  • एक आंतरराज्यीय पार्टी जी स्थानिक पातळीवर सेवांचा लाभ घेते.
  • एक आंतरराज्यीय पार्टी जी स्थानिक पातळीवर माल खरेदी करते, आणि त्यांच्या ठिकाणी पाठवतो.

मागील कालावधीत मिळालेल्या ऍडव्हान्सच्या तुलनेत सेल्स

मागील कालावधीत मिळालेल्या अॅडवांसच्या तुलनेत रेकॉर्ड झालेला सेल्स GSTR-1 आणि GSTR-3B मध्ये दिसून आली नाही.

हा प्रश्न सुटला आहे.

वैध GSTIN अवैध मानले गेले

काही GSTINs पूर्णपणे वैध असले, तरी ते अवैध मानले गेले.

हा प्रश्न सुटला आहे.

जेव्हा सप्लायची प्लेस बदलली गेली, तेव्हा परचेस व्हाउचरमधील GST कॅलक्युलेशन

परचेस व्हाउचरमध्ये, जेव्हा आपण पार्टी डिटेल्स स्क्रीनमध्ये सप्लायची प्लेस बदलली, तेव्हाही GST चे कॅलक्युलेशन पार्टीच्या लेजर मध्ये एंटर केलेल्या राज्यानुसार केली जात होती.

GST चे कॅलक्युलेशन आता व्हाउचरमध्ये स्पेसीफाय केलेल्या सप्लायच्या प्लेसनुसार केले जाईल.

सेल्स इंव्हॉईस बदलातील पार्टीचा तपशील

जेव्हा आपण सेल्स इंव्हॉईसमध्ये बदल केला, आणि पार्टी लेजर कॅशमध्ये बदलला, तेव्हा पार्टीचा रजिस्ट्रेशन टाइप अनरजिस्टरर्ड झाला, व  GSTIN/UIN पार्टी डिटेल्स स्क्रीनवरून काढून टाकण्यात आला.

आता, जेव्हा आपण पार्टीचे लेजर बदलता, तेव्हा आपण एकतर लेजर मधून मूळ तपशील टिकवून ठेवणे किंवा माहिती अपडेट करणे निवडू शकता.

परचेस व्हाउचर (कंपोझिशन डीलर्स) रेकॉर्ड केल्यानंतर इनकरेक्ट स्टॉक व्हॅल्यू

कंपोझिशन डीलर्ससाठी, स्टॉक समरी मध्ये काही स्टॉक आयटमचे व्हॅल्यूझ चुकीच्या प्रकारे दिसून आली.

हे तेव्हा घडले जेव्हा आपण भिन्न GST रेट्स असलेल्या स्टॉक आयटम्ससह परचेस व्हाउचर रेकॉर्ड केले, आणि नंतर संबंधित GST रेट्ससाठी तयार केलेले CGST आणि SGST लेजर जोडले.

हा प्रश्न सुटला आहे.

मल्टी-करन्सी व्हाउचर्ससाठी टॅक्स अनालिसिस आणि प्रिंट प्रीव्यूमध्ये CGST आणि SGST  

जेव्हा आपण मल्टी-करन्सीसह सेल्स इंव्हॉईस रेकॉर्ड केले, तेव्हा टॅक्स अनॅलिसिस मध्ये दर्शविल्याप्रमाणे CGST आणि SGST प्रिंट प्रीव्यूमध्ये दिसले नाहीत.

हा प्रश्न सुटला आहे.

प्रोव्हीजन्सनुसार तयार केलेल्या लेजरसाठी परचेस-संबंधित ट्रांसॅकशनचे नेचर उपलब्ध नाही

प्रोव्हीजननुसार तयार केलेल्या लेजर्ससाठी, परचेसशी संबंधित ट्रांसॅकशनचे नेचर उपलब्ध नव्हते.

आता आपण तरतुदीअंतर्गत तयार केलेल्या लेजरसाठी परचेस-संबंधित ट्रांसॅकशनचे नेचर निवडू शकता.

GSTR-3B मध्ये ITC साठी इनएलिजिबल वस्तूंचे RCM परचेसेस  

इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) साठी पात्र नसलेल्या वस्तूंची RCM परचेसेस GSTR-3Bच्या D. Ineligible for Input Tax Credit विभागासाठी आहे.

हा प्रश्न सुटला आहे.

कंपोझिशन डीलर्ससाठी स्टॉक ग्रुपमध्ये GST तपशील  कॉन्फिगर करणे

कंपोझिशन डीलर्स आता स्टॉक ग्रुपमध्ये जीएसटी डिटेल्स कॉन्फिगर करू शकतात.

हे स्टॉक ग्रुपअंतर्गत समान GST रेटसह एकाधिक स्टॉक आयटम्सचे ग्रुप करण्यास आणि GST तपशील प्रदान करण्यास मदत करते.

कंपोझिशन डीलर्ससाठी स्टॉक आयटममध्ये MRP रेट  स्पेसीफाय करणे

कंपोझिशन डीलर्स आता स्टॉक आयटममध्ये MRP रेट स्पेसीफाय करू शकतात.

व्हाउचर क्लासचा वापर करून रेकॉर्ड केलेले डिसकाऊंटमध्ये चुकीचे SGST आणि CGST कॅलक्युलेशन व्हाउचर क्लासचा वापर करून डिसकाऊंट लागू केले असता, सेल्स इंव्हॉईसमध्ये SGST आणि CGST चे चुकीचे कॅलक्युलेशन केली जात होते.

हा प्रश्न सुटला आहे.

प्रायमरी ग्रुप अंतर्गत तयार करण्यात आलेल्या लेजरसह  व्हाउचरचा GST रिटर्न्स मध्ये समावेश नाही

विशिष्ट लेजर असलेले व्हाउचर कोणत्याही GST रिटर्नमध्ये समाविष्ट केले गेले नाहीत.

हे तेव्हा घडले जेव्हा व्हाउचर्समध्ये इन्कम/एक्सपेन्स म्हणून ग्रुपचे नेचर असलेल्या प्राथमिक ग्रुपखाली एक लेजर तयार केले गेले होते.

हा प्रश्न सुटला आहे.

कंपनीच्या रिमोट बाजूला सेल्स इंव्हॉईस मधील GST/e-Way Bill तपशील

आपण रिमोट अॅक्सेसद्वारे कनेक्टेड कंपनीमध्ये काम करत असताना GST/e-Way Bill डिटेल्स पर्याय सेल्स इनव्हॉइसमध्ये उपलब्ध नव्हता.

हा प्रश्न सुटला आहे.

GSTR-1 मध्ये सुधारणा

GSTR-1 च्या डॉक्युमेंट समरीतील डेबिट नोट  

डेबिट नोट डॉक्युमेंट समरी मध्ये दोनदा दिसणे

जेव्हा आपण डेबिट नोट रेकॉर्ड केली, तेव्हा ती डॉक्युमेंट समरीमध्ये दोनदा दिसून आली – आउटवर्ड सप्लाय इंव्हॉईसेस अंतर्गत आणि डेबिट नोट अंतर्गत.

ही समस्या दूर झाली आहे, कारण ती आता फक्त डेबिट नोट अंतर्गत दिसेल.

डॉक्युमेंट समरी मध्ये डेबिट नोट (परचेस रिटर्न) आणि क्रेडिट नोट (परचेस प्राइज मध्ये वाढ)  

डेबिट नोट (परचेस रिटर्न) आणि क्रेडिट नोट (परचेस प्राइज मध्ये वाढ) ट्रांसॅकशन्स आता डॉक्युमेंट समरीमध्ये विचारात घेतले जातील.

एकाधिक पत्त्यांसह पार्टीसाठी सेल्स इंव्हॉईसेस

या आल्टरेशननंतर काही सेल्स इंव्हॉईस GSTR-1 मधील बी2बी इनव्हॉइसमधून बी2सी इनव्हॉइसमध्ये गेल्या.

जेव्हा आपण पार्टीच्या लेजरमध्ये दुसरा पत्ता जोडला, आणि नंतर इंव्हॉईस आल्टर केले तेव्हा हे घडले. परिणामी, पार्टीचा रजिस्ट्रेशन टाइप अनरजिस्टरर्ड झाला.

हा प्रश्न सुटला आहे.

GSTR-1 मध्ये Mismatch असलेल्या अनेक invoices ची निवड

जेव्हा आपण GSTR-1च्या अनसर्टन ट्रांसॅकशन (करेक्शन्स निडेड) मधून व्हाउचर विभागामध्ये मॉडीफाइड टॅक्सचा रेट, टॅक्सेबल व्हॅल्यू, ट्रांसॅकशनचा  नेचर शोधला, तेव्हा आपण रिसोलव्ह करण्यासाठी  किंवा जसे आहे तसे अॅक्सेप्ट करण्यासाठी एकाधिक इंव्हॉईसेस निवडू शकत नाही.

ही समस्या सोडविली जाते, कारण आपण एकाधिक इंव्हॉईसेस निवडू शकता, आणि जसे आहे तसे रिसोलव्ह किंवा अॅक्सेप्ट करू शकता.

GSTR-1 च्या एक्सपोर्ट केलेल्या MS Excel फाईलमध्ये दादरा आणि नगर हवेलीसाठी स्टेट कोड   

जेव्हा आपण MS Excel फाइल म्हणून GSTR-1 एक्सपोर्ट केली, तेव्हा दादरा आणि नगर हवेली व दमण आणि दीवसाठी स्टेट कोड उपलब्ध नव्हता.

अनरजिस्टरर्ड डीलर्स किंवा ई-कॉमर्स ऑपरेटरसाठी रेकॉर्ड केलेल्या बी2सी इंव्हॉईसेस मध्ये हे घडले.

हा प्रश्न सुटला आहे.

GSTR-1 मध्ये नोंद नसलेल्या एकूण अॅडवांसचा GST

जेव्हा आपण सेल्स रकमेच्या तुलनेत अंशत: अॅडवांस  ट्रॅक केला, तेव्हा एकूण अॅडवांसवरील GST GSTR-1 मध्ये रेकॉर्ड केला गेला नाही.

GST आता अंशत: अॅडवांससाठी अॅडजस्ट केला जाईल, आणि आपण उर्वरित अॅडवांस रकमेसाठी लायबिलिटी तयार करू शकाल.

GSTR-3B मध्ये सुधारणा

 कॅपिटल गूड्सचे इम्पोर्ट

 कॅपिटल गूड्सच्या इम्पोर्टसाठी रेकॉर्ड केलेले ट्रांसॅकशन्स गूड्स इम्पोर्ट सेक्शन मध्ये दिसले नाहीत.

असे ट्रांसॅकशन्स रिटर्न टेबल्स सेक्शनमध्ये डायरेक्ट परिणाम देत नाहीत.

हा प्रश्न सुटला आहे.

त्याच महिन्यात आर.सी.एम परचेससाठी स्टॅट अॅडजस्टमेंट व्हाउचरची टॅक्सेबल रक्कम

टॅक्सेबल रक्कम GSTR-3B मधील 3.1 (d) Inward supplies (liable to reverse charge) सेक्शन अंतर्गत दिसून आली नाही.

जेव्हा आपण आर.सी.एम परचेस व्हाउचर प्रमाणेच टॅक्स लायबिलिटी आणि इनपुट टॅक्स क्रेडिटच्या वाढवण्यासाठी जर्नल व्हाउचर रेकॉर्ड केले, तेव्हा हे घडले.

हा प्रश्न सुटला आहे.

GSTR-3B मधील अनसर्टन ट्रांसॅकशन्स

सेल्स आणि परचेसचे अनसर्टन ट्रांसॅकशन्स आता GSTR-3B, GSTR-1 आणि GSTR-2A मध्ये दिसतील.

GSTR-3B मध्ये न दिसणाऱ्या RCM परचेसेसचा GST  

RCM परचेसेस आणि इनपुट टॅक्स क्रेडिटसाठी रेकॉर्ड केलेली लायबिलिटी GSTR-3B मध्ये दिसली नाही.

जेव्हा आपण RCM लायबिलिटीसाठी RCM परचेसेस व्हाउचर, आणि त्याच महिन्यात परचेसशी संबंधित  इनपुट टॅक्स क्रेडिट रेकॉर्ड केले, तेव्हा हे घडले.

हा प्रश्न सुटला आहे.

रिटर्न रिपोर्ट्समध्ये सेल्स किंवा परचेसची निगेटिव्ह व्हॅल्यू हाताळणे

जेव्हा आपण निगेटिव्ह सेल्स किंवा परचेस व्हॅल्यू असलेली JSON फाईल अपलोड केली, तेव्हा GST पोर्टलवर त्रुटी निर्माण झाली.

तथापि, रिटर्न इफेक्टिव्ह डेटच्या नवीन सुविधेसह, आपण असे ट्रांसॅकशन्स वेगळ्या रिटर्न पीरियड मध्ये हलवू शकता आणि कोणत्याही पीरियडसाठी सेल्स किंवा परचेस व्हॅल्यू निगेटिव्ह नसल्याची खात्री करू शकता.

इनपुट टॅक्स क्रेडिट अंतर्गत न दिसणाऱ्या आयटीसी च्या रिव्हर्सलचा रीक्लेम रिव्हर्स केला

आयटीसीच्या रिव्हर्सल (ऑन अकाऊंट ऑफ बायर पेमेंट) रिक्लेमसाठी रेकॉर्ड केलेल ट्रांसॅकशन्स अदर्स अंतर्गत इनपुट टॅक्स क्रेडिट रिव्हर्स विभागामध्ये दिसून आले नाहीत.

हा प्रश्न सुटला आहे.

एक्सेमप्ट /नील-रेटेड आणि टॅक्सेबल आयटम्ससह इंव्हॉईसेस अपलोड करताना एरर

GSTR-3B फाइल करताना, जेव्हा आपण टॅक्सेबल वस्तूंसह एक्सेमप्ट /नील-रेटेड आयटम्स असलेले इंव्हॉईस अपलोड केले तेव्हा खालील एरर दिसून आली:

Table 3.1 (a), (b) and (c) are auto-drafted based on values provided in GSTR-1. Table 3.1 (d) is not auto-drafted based on GSTR-1.

हा प्रश्न सुटला आहे.

GSTR-3B प्रमाणे व्हाउचर कमी वेळेत करेक्ट करणे आणि अॅक्सेप्ट करणे

GSTR-3B मध्ये, व्हाउचर्स करेक्ट करणे आणि अॅक्सेप्ट करणे अपेक्षेपेक्षा जास्त वेळ घेते, विशेषत: अनसर्टन ट्रांसॅकशन्स (करेक्टशन्स निडेड) मध्ये नेव्हिगेट करताना.

व्हाउचर्स करेक्ट करण्यासाठी आणि रिसॉलव्ह करण्यासाठी आता कमी वेळ लागणार आहे.

GSTR-3B मध्ये डायरेक्ट एक्सपेनसेस शी संबंधित ट्रांसॅकशन्सचा समावेश नाही

डायरेक्ट एक्सपेनसेस ग्रुपशी संबंधित ट्रांसॅकशन्स GSTR-3B साठी रेलिवंट मानले गेले नाहीत. त्यांचा आता रिटर्नमध्ये समावेश केला जात आहे.

GSTR-2A Reconciliation सुधारणा

करंट लायबिलिटीझ अंतर्गत तयार केलेल्या लेजर्ससह व्हाउचर्सचे रीकंसिलेशन  

एखाद्या ट्रांसॅकशन मधील सर्व व्हॅल्यूझ  पोर्टल डेटाशी मॅच झाले, तरी काही ट्रांसॅकशन्स ऑटोमॅटिकली रीकंसाइल होत नाहीत. करंट लायबिलिटीज अंतर्गत तयार करण्यात आलेल्या पार्टी लेजर्सशी झालेल्या ट्रांसॅकशन्सबाबत हे घडले.

हा प्रश्न सुटला आहे.

 रीकंसिलेशनसाठी GST स्टेट्स मॅन्युअली सेट करणे

GSTR-2A मध्ये इम्पोर्ट केलेल्या ट्रांसॅकशन्सना मॅन्युअली मार्क करता येत नाही.

GST स्टेट्स सेट करण्याची सुविधा आता विनाअडथळा काम करत असल्याने हा प्रश्न सुटला आहे.

रीकंसिलेशनसाठी विचारात घ्यावयाच्या कोणत्याही पीरियड मधील ट्रांसॅकशन्स

TallyPrime आता GSTR-2A मध्ये फेरफार करण्यासाठी कोणत्याही पिरीयड मध्ये रेकॉर्ड केलेल्या व्हाउचर्सचा विचार करते.

करंट रिटर्न मध्ये मागील आर्थिक वर्षाचे परचेस व्हाउचर

मागील आर्थिक वर्षातील परचेस व्हाउचर चालू आर्थिक वर्षाच्या GSTR-2A रीकंसिलेशनमध्ये दिसून आले.

जेव्हा आपण सप्लायर इंव्हॉईस नंबर्स एंटर केले, तेव्हा हे घडले. जे मागील आर्थिक वर्षात याच पार्टीसाठी वापरले गेले होते.

सप्लायर इनव्हॉइस नंबर याच पार्टीसाठी मागील आर्थिक वर्षातील परचेस व्हाउचर्स चालू आर्थिक वर्षात दिसले.

डुप्लिकेशन असूनही केवळ चालू आर्थिक वर्षातील परचेस व्हाउचर आता जीएसटीआर-2ए रिकंसिलेशनमध्ये दिसतील.

GSTR-2A चे नील रेटेड ट्रांसॅकशन्स कमी वेळेत री-सेव्हिंग करा

GSTR-2A मध्ये निल रेटेड स्टॉक आयटम्स किंवा लेजर्सच्या ट्रांसॅकशन्ससाठी रि-सेव्हिंग व्हाउचर्सला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला.

त्यासाठी आता खूपच कमी वेळ लागणार आहे.

GSTR-4 मध्ये सुधारणा

GSTR-4 मध्ये सेल्स इंव्हॉईसेस

GSTR-4 मध्ये, सेल्स इंव्हॉईसेस दोन्ही विभागात दिसत होते – इनक्लुडेड इन रिटर्न आणि रेलेवंट फॉर धिस रिटर्न.

सेल्स इंव्हॉईसेस केवळ इनक्लुडेड इन रिटर्न विभागात दिसतील.

GSTR-4 मध्ये समाविष्ट नसलेल्या अनरजिस्टरर्ड पार्टीजकडून  RCM परचेसेस 

अनरजिस्टरर्ड पार्टीजसाठी रेकॉर्ड केलेले  RCM परचेस ट्रांजॅकशन GSTR-4 साठी रेलिवंट मानले गेले नाहीत. त्यांचा आता रिटर्नमध्ये समावेश केला जात आहे.

GSTR-4 च्या 4A&B (B2) वर्कशीटमध्ये चुकीची प्लेस ऑफ सप्लाय  

जेव्हा आपण विभागाने प्रदान केलेल्या MS Excel टेम्पलेटमध्ये GSTR-4 एक्सपोर्ट केले, तेव्हा 4A&B (B2B) वर्कशीटमध्ये प्लेस ऑफ सप्लाय चुकीची होती.

हा प्रश्न सुटला आहे.

 e-Way Bill साठी ट्रांसॅकशन्स वगळून

e-Way Bill मधील युजर-एक्सक्लुडेड ट्रांसॅकशन्स ई-इनव्हॉइसिंग मधून पण वगळले जात आहेत

काही व्हाउचर्स ई-इनव्हॉइसिंगमधून वगळले जात असत.

e-Way Bill रिपोर्टच्या युजर- एक्सक्लुडेड ट्रांसॅकशन्स (नॉट रेलिवंट) अंतर्गत व्हाउचर्सच्या बाबतीत हे घडले.

हा प्रश्न सुटला आहे.

ई-वे बिल रिपोर्ट मधून अनेक ट्रांसॅकशन्स वगळण्यासाठी पार्शियल सिलेक्शन

ई-वे बिल रिपोर्ट मध्ये, आपण मिसिंग /इनवॅलिड इन्फॉर्मेशन सेक्शन मध्ये सर्व निवडलेले इंव्हॉईसेस वगळू शकत नाही.

जेव्हा एकाच वेळी बऱ्याच इंव्हॉईसेस वगळण्यासारख्या होत्या, तेव्हा हे घडले.

ही समस्या सुटली आहे, कारण आपण आता ई-वे बिल रिपोर्ट मधून वगळण्यासाठी जास्तीत जास्त इंव्हॉईसेस निवडू शकता.

डिलीटेड व्हाउचर मॉडीफाइड म्हणून डिस्प्ले केले

 eइंव्हॉईस रिपोर्टच्या क्यू.आर कोड विभागाशी व्हाउचर इन्फॉर्मेशन मिसमॅचमध्ये, डिलीटेड व्हाउचर्स, व्हाउचर तारीख आणि eइंव्हॉईस-संबंधित तपशीलांशिवाय मॉडीफाइड म्हणून दिसून आले.

ही समस्या सोडविली जाते. कारण डिलीट केलेले व्हाउचर डिलीट म्हणून दिसतील, आणि ई-इनव्हॉइस तपशील कायम ठेवले जातील.

डेटा स्प्लिट दरम्यान  एम.ए.व्ही एरर

काही प्रकरणांमध्ये, मेमरी अॅक्सेस व्हॉयलेशन (एम.ए.व्ही) एररमुळे डेटा स्प्लिट मध्ये व्यत्यय आला.

हा प्रश्न सुटला आहे.

TallyHelpwhatsAppbanner
Is this information useful?
YesNo
Helpful?
/* */