Explore Categories

 

 PDF

TallyPrime Release 2.1 आणि TallyPrime Edit Log Release 2.1 च्या साठी रिलीज़ नोट्स | समजून घेऊया काय नवीन आहे!

TallyPrime सोबतआपला प्रवास अधिक आनंददायक होईल यासाठी तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवू शकता कारण आम्ही TallyPrime च्या फिचर्स मध्ये वाढ केली आहे जसे कि एडिट लॉग, ह्या फिचर्सच्या मदतीने आपल्या व्यवसायाचा डेटा व्यवस्थित मॅनेज करता येईल कारण एडिट लॉग तुम्हाला तुमचे मास्टर व ट्रांजेक्शन्समध्ये केले जाणारे बदल याचा मागोवा सहजरीत्या उपलब्ध करून देतो.

Release 2.1 सोबत, खाली नमूद केलेला कोणताही पर्याय तुम्ही निवडू शकता:

  • TallyPrime Edit Log: आपल्या व्यवसायामध्ये वित्तीय कार्य प्रणाली नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्यास. आपण हे उत्पादन वापरू शकता.
    या उत्पादनामध्ये लॉग संपादित करणे अक्षम केले जाऊ शकत नाही.

  • TallyPrime: जर तुम्हाला अंतर्गत लेखापरीक्षणाच्या उद्देशांसाठी ट्रेल्स ठेवायचे असल्यास किंवा अधूनमधून लॉग पहायचे असतील, तर तुम्ही तुमच्या दैनंदिन व्यवसाय ऑपरेशन्समध्ये एडिट लॉग सुविधेचा फायदा घेऊ शकता.
    जेव्हा आवश्यक असेल तेव्हा तुम्ही एडिट लॉग सक्षम किंवा अक्षम करू शकता. डिफॉल्ट TallyPrime तुमच्या डेटा एंट्रीस आणि मास्टर्स मधील बदलांची नोंद घेणार नाही.

शिवाय, डिजिटल स्वाक्षरीची सुविधा तुम्हाला तुमच्या कागदपत्रांवर डिजिटल स्वाक्षरी आणि प्रमाणीकरण करण्यास मदत करेल. त्यानंतर, तुम्ही ते संबंधित व्यक्तींना सुरक्षितपणे शेअर करू शकता.

महत्वाचे मुद्दे TallyPrime and TallyPrime Edit Log Release 2.1

एडिट लॉग याबद्दल परिचय

TallyPrime एडिट लॉगच्या मदतीने तुम्हाला आपल्या आर्थिक माहितीचा मागोवा ठेवणे शक्य आहे, ज्यामूळे आता तुम्हाला व्हाउचरर्स, मास्टर्स आणि ट्रांजेक्शन्समध्ये झालेले बदल बारकाईने निरखता येतील.

TallyPrime एडिट लॉगच्या मदतीने तुम्ही हे करू शकता :

  • निम्नलिखित सर्व क्रियाकलापांचा मागोवा घेऊ शकता :
    • सगळे व्हाउचरर्स,
    • मास्टर्स: स्टॉक आयटमस, लेजर्स आणि अकाउंटिंग ग्रुप्स.
    • कंपनी डेटा : मायग्रेशन, रिपेअर, इम्पोर्ट, स्प्लिट ,आणि इतर.
  • एडिट लॉग स्क्रीनमध्ये खालील पैलूंबद्दल माहिती संपादन करा
    • व्हर्जन क्रमांक जो विशिष्ट व्यवहार किंवा मास्टरसाठी तयार केलेल्या लॉगची संख्या कॅप्चर करतो.
    • Tally मध्ये क्रीएशन, अल्ट्रेशन, आणि डीलीशन ह्या कार्या बद्दल माहिती
    • कोणत्या युझरद्वारे बदल केले गेले.
    • बदल झाल्याची तारीख व वेळ.
  • ड्रिल डाउन च्या माध्यमाने जुन्या व्हर्जन मध्ये झालेले चेंजेस यांची तुलना.
    ह्या व्यतिरिक्त तुम्ही दोन भिन्न values मधील तुलने ला आपल्या इच्छे अनुसार configure करू शकाल.
    उदाहरणार्थ एक Value जी Alter केल्या गेली आणि एक Value जी कॉन्फीगर्ड आहे , ह्या दोन्ही Value मध्ये तुलना करू शकाल.
  • आल्टर आणि डिलेटेड पाहण्याची सुविधा.
    • डे बुक आणि लेजर रिपोर्टमधील व्हाउचरर्स यांचे आल्टर पाहण्याची सुविधा.
    • चार्ट ऑफ अकाउंट्स मध्ये लेजर डिलेशन पाहण्याची सुविधा.
  • Save View द्यारे बनवलेले रिपोर्ट्स कायम ठेवून डेटा मायग्रेशन करू शकता.

आणखी काय !

तुमच्‍या व्‍यवसायाच्या एडिट लॉगच्या आवश्‍यकतेनुसार, तुम्ही दोन पर्यायांमधून निवड करू शकता:

  • TallyPrime Edit Log Release 2 .1: तुमच्या व्यवसायाला संपूर्ण आर्थिक वर्षात चांगल्या अंतर्गत नियंत्रणासाठी सर्व क्रियाकलापांचा मागोवा घेणे आवश्यक असल्यास. आपण हे उत्पादन वापरू शकता, कारण तुम्ही लॉग फिचर डिसेबल करू शकत नाही. 
  • TallyPrime Release 2.1: गरज असल्यास Edit Log feature ऍक्टिव्हेट करून आपल्या Tally मधील घडामोडी चा तुम्ही संपुर्ण ट्रैक ठेवू शकाल.
    ह्या मूळे तुम्ही Tally च्या डेटा आल्टर किव्हा डिलीट करण्या वर पुर्ण पणे नियंत्रण ठेवण्याची खात्री घेऊ शकाल.

अधिक जाणून घेण्यासाठी Edit Log in TallyPrime विषयातील संदर्भ घ्या.

PDF डॉक्युमेंट मध्ये डिजिटल सिग्नेचर जोडणे

TallyPrime Edit Log Release 2.1 and TallyPrime Release 2.1 ह्या मध्ये आता डोंगल च्या साहाय्याने तुम्हाला डिजिटल सिग्नेचर करणे शक्य आहे.

खालील दिलेले कार्य करताना तुम्हाला डिजिटल सिग्नेचर वापरता येईल:

  • डॉक्युमेंट ला PDF मध्ये एक्स्पोर्ट करताना.
  • PDF डॉक्युमेंट ई-मेल करताना.
  • प्रिंटिंग पूर्व डॉक्युमेंट ला PDF मध्ये सेव करताना.

या शिवाय तुम्हाला मल्टि वाउचर रिपोर्ट मध्ये डिजिटल सिग्नेचर जोडता येईल, ह्या च्या मदतीने तुम्हाला आपल्या व्हाऊचर्स वर डिजिटली साईन आहे अथवा नाही ह्याची खात्री करून घेता येईल.

डिजिटल स्वाक्षरीसह, तुम्ही सत्यता आणि सचोटीची खात्री करू शकता, तुमच्या भागधारक, ग्राहक ऑडिटर्स आणि चार्टर्ड अकाउंटंट्स सोबत आता अत्यंत सुरक्षित पणे आपले PDF डॉक्यूमेंट शेअर करू शकता.

अधिक जाणून घेण्यासाठी Digital Signature in TallyPrime विषयातील संदर्भ घ्या .

आणखी काय !

तुम्ही विशिष्ट लेजर आणि कालावधीसाठी मल्टी-व्हाउचर अहवाल रिपोर्ट प्रिंट, एक्स्पोर्ट अथवा ई-मेल सुद्धा करू शकाल.

अधिक जाणून घेण्यासाठी Multi-Voucher/Invoice for a selected party चा संदर्भ घ्या.

Post a Comment

Is this information useful?
YesNo
Helpful?