TallyPrime आणि TallyPrime Edit Log Release 6.0च्या रिलीज नोट्स. जाणून घ्या नवीन काय आहे!
English | हिन्दी | বাংলা | తెలుగు | ગુજરાતી | ಕನ್ನಡ | മലയാളം
आपल्या दैनंदिन बँक व्यवहारांचा कायापालट होऊन ते अतिशय सोपे झाल्याचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही TallyPrime चे रिलीज 6.0 वापरायलाच हवे. – म्हणजे त्यातील “कनेक्टेड बँकिंग” तुम्ही वापरायला हवे. हे केल्याने तुम्ही तुमचा अमूल्य वेळ (चाकोरीबद्ध दैनंदिन कामात न घालवता) व्यवसाय वृद्धी साठी वापरू शकाल.
डेटा स्प्लिट सुद्धा आत्ता सुलभ झाले आहे. ह्याचे श्रेय जाते ते त्रुटी शोधण्याच्या कणखर प्रणालीला. नव्या “प्रोफाइल फीचर” मुळे तुम्ही तुमची संपर्क सूची (फोन नंबर, मेल आयडी वगैरे) अद्ययावत ठेवू शकता आणि निरोपांची देवाण घेवाण बिनचूक व वेळेवर होऊ शकते. या नव्या प्रोफाइल फीचर चा जास्तीत जास्त फायदा करून घ्या.
TallyPrime आता खालील गोष्टींना आधारभूत मानून काम करते 2025-26 च्या अर्थ – मसुदयात (फायनान्स बिल) निर्धारित केलेले कराचे दर (उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे) व एच् एस् एन् समरीचा तिसरा विभाग ज्यात B2B व B2C चे वर्गीकरण केलेले आहे. जी.सी.सी. देशांमध्ये आता द्विभाषिक (दोन भाषांमधून) बिलं छापता येतील – VAT सह किंवा VAT विना.
याच बरोबर 6.0 मध्ये GST, TDS, VATशी संबंधित बऱ्याच नवीन गोष्टींचा पण समावेश करण्यात आला आहे. ह्या अशा गोष्टी आहेत ज्या मुळे तुमचं TallyPrime अधिकाधिक फलप्रद होईल.
तुम्ही रिलीझ नोट्स English मध्ये देखील वाचू शकता.
तुमच्या व्यवसायासाठी लागणाऱ्या बँकिंगचा कायापालट करा
“कनेक्टेड बँकिंग” आणि प्रगत स्वरूपातील बँक ताळमेळ पद्धत (रिकन्सिलीएशन) – TallyPrime 6.0 मधल्या या दोन सोयी अशा आहेत की ज्यांच्यामुळे बँकिंग हा एक प्रसन्न अनुभव होऊन जातो. आपल्या खातेपुस्तिका आणि आपला बँकेचा खातेउतारा यांच्यातील व्यवहारांचा योग्यप्रकारे ताळमेळ घालण्यासाठी 6.0 मधील प्रगत बँक रिकन्सिलीएशन पद्धतीची मदत होते. नित्य आणि नैमित्तिक अशा बँक व्यवहारांसाठी जो वेळ द्यावा लागतो त्यामध्ये, ‘कनेक्टेड बँकिंग’ मुळे मोठी बचत होते.
प्रमुख वैशिष्ट्ये
- प्रगत स्वरूपातील बँक ताळमेळपत्रक ( बँक रिकन्सिलीएशन स्टेटमेंट) – आपल्या खातेपुस्तिका व आपला बँकेचा खातेउतारा यांतील ज्या एंट्रीज तंतोतंत जुळतात त्या आपोआपच रिकन्साइल होत जातात . या स्वयंचलित पद्धतीमुळे वेळ वाचतो व अचूकता वाढते. दोन्हीकडच्या ज्या एंट्रीज जुळण्याची शक्यता मोठी आहे,( पोटेन्शीयल मॅच ) त्याबद्दल तुम्हाला सूचना दिली जाते.
- बँक खातेउताऱ्याच्या मदतीने स्वयंचलित खातेबांधणी – बँकेचा डेटा वापरुन तुम्ही आता थेट व्हाऊचर बनवू शकता. बँकिंगच्या कामातील कंटाळवाणी पुनरावृत्ती यामुळे टळते आणि खातेबांधणीचे काम सोपे होते.
- तुमची खातेबांधणी व तुम्ही दिलेल्या / देणार असलेल्या रकमा यांच्यातील सांधलेला तोल – e–Payments साठी आता नवा व सुटसुटीत रिपोर्ट दिला गेला आहे. यामुळे तुम्ही केलेल्या e-Payments चा मागोवा घेता येतो. 18 पेक्षा जास्त बँकांसाठी ही सुविधा मिळते.
- कनेक्टेड बँकिंग – कॅश फ्लो जास्त चांगल्या पद्धतीने पहा. ‘कनेक्टेड बँकिंग’ च्या आधारे जलद निर्णय घ्या. TallyPrime तुमच्या बँक खात्याला सर्वोच्च सुरक्षितता प्रदान करते. तुमची बँक खाती TallyPrime ला जोडून घ्या आणि बँकेतील शिल्लक, खातेउतारा यांची त्या क्षणाची स्थिती जाणून घ्या.
बँक ताळमेळ पत्रक( बँक रिकन्सिलीएशन स्टेटमेंट) आता प्रगत स्वरूपात
बँकेचे ताळमेळ पत्रक बनवताना बऱ्याचदा असे होते की काही रकमा आपल्या खाते पत्रकांमध्ये जशा असतात तंतोतंत तशाच () बँकेच्या खातेउताऱ्यांमध्ये असतात. बँकेचा खातेउतारा इम्पोर्ट करतानाच अशा तंतोतंत जुळणाऱ्या रकमा तुम्ही आपोआप जुळवू शकता किंवा नंतर करण्यासाठी हे काम बाजूलाही ठेवू शकता. यासाठी आवश्यक ते कॉन्फिग्रेशन तुमच्या टॅलीच्या बँक लेजर मध्ये सुलभतेने करता येते.
- तंतोतंत जुळणाऱ्या रकमांखेरीज काही एंट्रीज अशा असतात की त्या जुळण्याची शक्यता मोठी असते.(मॅच होण्याची शक्यता). (या प्रकारच्या एंट्रीज मध्ये राऊंडऑफचा फरक, तारखेतला फरक यासारखे मुद्दे येतात). बऱ्याचदा हे फरक दुर्लक्ष करून या एंट्रीज जुळवाव्या / जुळवून घ्याव्या लागतात. तुमच्या व्यवसायाच्या सोयीप्रमाणे, अशा एंट्रीजसाठी तुम्ही स्वतःचे नियम ठरवू शकता. यामुळे तुमचे काम सोपे होते.
- वरील दोन पद्धतीनंतरही काही एंट्रीज न जुळणाऱ्या राहतात (अनरिकन्साइल्ड) त्यांच्यासाठी योग्य पर्याय तुम्ही शोधू शकता.
- टॅली मधील बँक खात्यातील एंट्रीज आणि बँकेच्या खातेउताऱ्यातील एंट्रीज जुळवून घेण्यासाठी “एकास एक संगती’” किंवा “एकास अनेक संगती” यांपैकी कोणतीही एक किंवा दोन्ही पद्धती निवडा.
- जर तुम्हाला रिकन्सिलीएशन हातानेच करायचे असेल तर तसेही करता येते.
- जर तुम्ही पहिल्यांदाच ताळमेळपत्रक बनवत असाल तर तुम्ही त्यासाठी एक तारीख निश्चित करू शकता. न जुळलेल्या (अनरेकॉनसाइल्ड ) एंट्रीज – ओपनिंग बीआरएस रिपोर्ट (
) मध्ये टाकू शकता. या एंट्रीज आता बँक ताळमेळ पत्रकात दिसू लागतील आणि ताळमेळ पत्रक बनवण्यासाठी “ सिद्ध स्वरूपात “ असतील.
- जर तुम्ही कंपनी विभाजित केली , तर न जुळलेल्या एंट्रीज ‘ओपनिंग बी. आर. एस.’ रिपोर्ट मध्ये दिसू लागतील.
जास्त माहितीसाठी बँक रिकन्सिलिएशन हे प्रकरण पहा.
बँक खातेउताऱ्याच्या मदतीने स्वयंचलीत व्हाऊचर निर्माण
इम्पोर्ट केलेल्या खातेउताऱ्याच्या मदतीने एका झटक्यात वॉउचर्स तयार होऊ शकतात. स्वयंचलित व्हाऊचर निर्माण (ऑटोमेटेड व्हाऊचर क्रिएशन ) हे विलक्षण लवचिक आहे, का? तर –
- एकाच समायिक लेजर मधून (कॉमन लेजर) किंवा वेगळ्या लेजर मधून बहुविध वॉउचर्स (
) तयार होतात.
- बहुविध वॉउचर्सचे विलीनीकरण करून समुचित रकमेचे एक व्हाऊचर करता येते.
एवढेच नव्हे तर सर्व महत्वाची माहिती उदा. नरेशन, चेक वा रोख कागदपत्राचा नंबर, तारीख, रक्कम हे सर्व आपोआप भरले जातात. वेळ व श्रमाची मोठी बचत होते.
नवीन आधुनिक पद्धतीचे बँक रिपोर्टस
बँक व्यवहारांचा रिपोर्ट (बँकिंग अक्टीव्हीटीज), सारांश स्वरूपातले बँक ताळमेळ पत्रक (बँक रिकन्सिलिएशन समरी) आणि सविस्तर स्वरूपातले बँक ताळमेळ पत्रक (बँक रिकन्सिलिएशन) – या गोष्टींमुळे बँक ताळमेळपत्रक बनवणे आणखी सुलभ झालेले आहे.
- बँक व्यवहारांचा रिपोर्ट (बँकिंग अक्टीव्हिटीज )- या रिपोर्टमुळे सर्व बँक लेजर्सचा धावता आढावा घेणे शक्य होते. ताळमेळ पत्रक व ई-पेमेंट्सच्या संदर्भातल्या अपूर्ण राहिलेल्या गोष्टी आपण पाहू शकता. बँक रिकन्सिलिएशन and ई–पेमेंट्स (
)
- याच रिपोर्टमध्ये आणखी खोलात शिरल्यास विशिष्ट बँकेचे ताळमेळ पत्रक सारांश स्वरूपात दिसते. टॅली मधील बँक खात्यात दिसणारी रक्कम आणि खातेउताऱ्यातील रक्कम, उचल, जमा रक्कम तसेच न जुळलेल्या ई-पेमेंट्सच्या रकमा याही दिसतात.
- सारांश स्वरूपातले बँक ताळमेळ पत्रका ( बँक रिकन्सिलिएशन ) मधील “न जुळलेल्या“ (अनरिकनसाइल्ड) एंट्रीज च्या खोलात जाऊन बँक रेकॉनसीलीएशन रिपोर्ट )बघता येतो. बँक ताळमेळ पत्रक बनवणे खूप सोपे होऊन जाते.
- बँक व्यवहाराच्या रिपोर्ट( बँक अक्टीव्हिटी ) मधून थोडे खोलात शिरले तर (ड्रिल डाऊन ) ई-पेमेंट्स रिपोर्ट दिसतो. या रिपोर्टचा चेहरामोहरा आता अतिशय नवीन स्वरूपात आला आहे. आणखी थोडं खोलात शिरा (ड्रिल डाऊन ) – आपल्या देय रकमांचे सविस्तर स्वरूप नीट बघा आणि मगच TallyPrime ला एक्सपोर्ट करा.
- बँकेशी संबंधित माहिती उदा. खाते क्रमांक, येण्या – देण्याच्या व्यवहारांची पद्धत तसेच या व्यवहारांची माहिती या गोष्टी आता ‘लेजर् व्हाऊचर रिपोर्ट’ आणि ‘डे बुक ‘ मध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.यामुळे एखाद्या व्यवहारातील इन्सट्रूमेंट नंबर, डेट च्या आधारे देय/ दिलेल्या रकमा व त्यांचे ताळमेळ पत्रकातील स्वरूप यांचा मागोवा घेता येतो.
जास्त माहितीसाठी बँक रिकन्सिलिएशन हे प्रकरण बघा
कनेक्टेड बँकिंग – एक सुरक्षित, विविधतापूर्ण अनुभव
आपण जर एकापेक्षा जास्त बँकांशी व्यवहार करत असाल तर प्रत्येक वेळी त्या त्या बँकेचे पोर्टल उघडावे लागते. याऐवजी आता कनेक्टेड बँकिंग द्वारा एकच, सुरक्षित लॉग-इन () वापरुन (टॅली Dot Net वरील क्रेडेन्शीयलस् च्या आधारे) तुमची सर्व बँक खाती तुम्ही TallyPrime मधून पाहू शकता (
). व हयातून तुम्ही.
- TallyPrime मधून क्षणार्धात खात्यावरची शिल्लक बघू शकता (
) बऱ्याचदा तुम्हाला काही रकमा त्वरित पाठवायच्या असतात. काही वेळ बँकेच्या खातेउताऱ्यामध्ये दाखवलेली शिल्लक व तुमच्या टॅली संबंधित बँक खात्यावर दिसत असलेली शिल्लक यांची तुलना तुम्हाला आवश्यक वाटते. याठिकाणी कनेक्टेड बँकिंग ची मोठी मदत तुम्हाला मिळते.
इतकेच नव्हे – लेजर वॉउचर्स, ग्रुप समरी सारख्या रिपोर्टस मधून तुम्ही खात्यावरील शिल्लक बघू शकता.
- बँकेच्या ताळमेळ पत्रकासाठी तुम्ही बँकेचा खातेउतारा ऑन लाइन मिळवू शकता (
)
जास्त माहितीसाठी संदर्भ – कनेक्टेड बँकिंग
बँकिंग मधील अन्य सुधारणा
बँकेसंबंधी सर्व माहिती तुमच्या कंपनी बुक्स मध्ये
आता तुम्ही तुमचा बँक डेटा टॅली मध्ये इम्पोर्ट करू शकता. भारतातील 145 बँका आणि आशिया, आफ्रिका व उ. अमेरिकेतील 80 बँकांना ही सुविधा उपलब्ध आहे.इम्पोर्ट केलेला बँक डेटा तुमच्या कंपनी डेटा मध्ये साठवला जातो. तुम्हाला हवा तेव्हा तुम्ही झटकन तो बघू शकता. तुमच्या लेखा परीक्षणासाठी याचा खूप उपयोग होतो.
e–payment पाठवण्यासाठी नवी सोय
व्हाऊचरच्या रकमेनुसार त्यांचे पेमेंट करण्यासाठी तुम्ही, IMPS/ RTGS असे पर्याय सोयीनुसार निवडू शकता. यातली महत्वाची गोष्ट अशी की e–Fund ट्रान्सफर मोड हे वौचर्सना आपोआप लागू होते.
बँक आणि बँकेचे ताळमेळ पत्रक आता तुमच्या रिसीट – पेमेंट मध्ये
बँक आणि बँकेचे ताळमेळ पत्रक आता तुमच्या रिसीट – पेमेंट मध्ये सविस्तर दिसेल. नवीन व्हाऊचर तयार करताना किंवा आधी केलेल्या व्हाऊचर मध्ये बदल करताना या माहितीचा संदर्भ तुम्हाला सहजपणे उपलब्ध होईल.
कनेक्टेड बँकिंग आणि ताळमेळ-पत्रकांसाठी शीर्षकव्यवस्था
“ताळमेळ न झालेले बँक व्यवहार”/“तुमच्या बँकेतील शिल्लक” अशा शीर्षकाखाली बँकेशी संबंधित माहिती आपण पाहू शकता.
बँक व्यवहारांशी संबंधीत बारकावे आता Edit Log मध्ये
तारखेतील बदल, चेक वा अन्य कागदपत्रातील तारीख किंवा अनुक्रमांक यातील बदल इतकेच नव्हे तर तुमच्या ग्राहकांचा UPI ID – – – Edit log मध्ये आता हे सर्व दिसेल
कंपनी डेटा विभाजन
कंपनी विभाजनासाठी एक साधी, सुटसुटीत सोय 6.0 मध्ये आहे. सुधारित स्वरूपातल्या दृश्यचौकटी (स्क्रीनस), कंपनी विभाजनाचे नवे पर्याय, डेटा पारखून घेण्यासाठी सूची -चिन्ह, आणि डेटा पारखून घेण्याची नवी पद्धत – या सर्व गोष्टींमुळे कंपनी विभाजन अतिशय सुसूत्र पद्धतीने होते.
विभाजनानंतर एकच एक कंपनी तयार होणे
सुधारित विभाजन पद्धतीनुसार () विभाजनानंतर एकच एक कंपनी तयार होते. डेटाची हाताळणी यामुळे सोपी, सुरक्षित होते. जर तुमचा डेटा जास्त असेल, तर कंपनी विभाजन करताना, सध्याच्या कालावधीचीच कंपनी तुम्ही तयार करू शकता. ह्याने व्यवसायाची कार्यक्षमता वाढायला मदत होते.
(सर्वात उपयुक्त भाग असा की जर तुम्हाला पूर्वीचीच पद्धत वापरायची असेल तर तो पर्यायही खुला आहे.) दोन कंपन्यांचे विभाजन () यामुळे कायदेशीर, करविषयक गोष्टींची पूर्तता करण्यासाठी एक कंपनी उपलब्ध ठेऊन दुसऱ्या लेटेस्ट कंपनी द्वारे तुम्ही व्यावसायिक हिशेबाची कामे करू शकता.
कंपनी विभाजनाची प्रक्रिया सुरू असताना त्याची क्रमश: प्रगती दाखवणारा बार पण आता उपलब्ध आहे.
डेटा पारखून घेण्याच्या पद्धतीत सुधारणा (
)
व्हॉऊचर्स व मास्टर्स मधल्या अनेक प्रकारच्या त्रुटी सुधारण्याची क्षमता या नव्या पद्धतीत आहे. चुका मुळातच टाळाव्यात व अचूकता वाढावी यासाठी एक सूचिचिन्ह (प्रॉम्प्ट) तयार केले गेले आहे, ज्यायोगे विभाजनाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी तुम्ही डेटा पारखून घेऊ शकता.
जास्त माहितीसाठी संदर्भ – TallyPrime मध्ये डेटा स्प्लिट ()
कंपनी विभाजनातील व डेटा पारखून घेण्यातील इतर सुधारणा
खालील त्रुटी सुधारल्या आहेत –
- डेटा पारखून घेण्याच्या प्रक्रियेत Out of Memory/Memory Access Violation या त्रुटि येणे.
- TallyPrime Edit Log मध्ये व्हॉऊचर स्प्लिटची प्रक्रिया मंदगतीने होणे, थांबणे, किंवा लांबणे
- TallyPrime Edit Log मध्ये “Restart and continue” ची त्रुटी. (टॅली च्या अंगभूत मर्यादांचे तात्पुरते उल्लंघन होऊन या त्रुटी येत असत.)
प्रोफाइल डिटेल्सची सोपी हाताळणी
तुमच्या टॅली सिरियल नंबरशी निगडीत असलेली सर्व माहिती बघण्याची व त्यात सुधारणा करण्याची नवी सोय 6.0 मध्ये देण्यात आली आहे. आपली संपर्क सूची (कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन) अचूक असेल तर विविध संदेश आपल्यापर्यंत वेळेत पोहोचतात.
प्रमुख वैशिष्ट्ये
TallyPrime मधील आपल्या संपर्क सूचीपर्यन्त (टेलिफोन नंबर, ई-मेल आयडी इ.) सोप्या पद्धतीने पोहोचा/ त्यात आवश्यक ते बदल करा.
- काही अधिकचे बदल, सुधारणा यासाठी टॅली पोर्टल चुटकीसरसे बघा
- आपली प्रोफाइल डिटेल्स तपासण्याची/ त्यात काही बदल करण्याची स्मरणपत्रे (रिमाइंडर्स) वर्षातून दोनदा तुम्हाला येतील.
तुमचे प्रोफाइल अद्ययावत ठेवा व त्यायोगे संबंधितांशी योग्य प्रकारे संपर्कात रहा.
अधिक माहितीसाठी संदर्भ – प्रोफाइल डिटेल्स
नवीन करप्रणाली साठी आयकराचे सुधारित दर(उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे)| 2025-26 चा अर्थ मसुदा ( फायनान्स बिल)
कंपनीतील काही कर्मचारी नवीन कर प्रणाली स्वीकारतात. अशा कर्मचाऱ्यांना लागू होणारे आयकराचे दर TallyPrime मध्ये आधारभूत मानले जातात.तसंच इन्कम टॅक्स कॉम्प्यूटेशन रिपोर्ट, फॉर्म 24Q चे अनेक्शर II आणि फॉर्म 16 यामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात आल्या आहेत –
- बारा लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांना, सेक्शन 87A नुसार मिळणारी वजावट
- बारा लाखांपेक्षा थोडे जास्त उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना मिळणारी किरकोळ कर सवलत ( असे उत्पन्न व बारा लाख यातील फरक रु. 70,594 किंवा त्यापेक्षा कमी असला पाहिजे)
जी. सी. सी. देशामध्ये द्विभाषिक (दोन भाषांत ) बिलं छापण्याची सुविधा / VAT सह किंवा VAT विना
TallyPrime च्या मदतीने आता कुवेत आणि कतार मधले व्यावसायिक कागदाच्या एकाच पानावर द्विभाषिक ( दोन भाषांमधून) बिल तयार करू शकतात, स्थानिक करविषयक नियमांचे पालन खात्रीपूर्वक होते. कतार आणि कुवेत खेरीज इतर देशात जर तुमचा व्यवसाय असेल तर इंग्लिश आणि अरेबिक मध्ये बिलं ( VAT सह किंवा VAT विना)छापण्याची पद्धत तुम्ही पुढे चालू ठेऊ शकता.
एच् एस् एन् समरीचा विभाग तीन / B2B व B2C बिलाचे योग्य वर्गीकरण
जी.एस्.टी.आर्-1 साठी लागणाऱ्या एच् एस् एन् समरीच्या विभाग तीन ला आधारभूत मानून TallyPrime चे काम चालते. यात B2B व B2C चे योग्य वर्गीकरण असते.
GST मधील सुधारणा
GSTR1 बाबत – आधी अपलोड व नंतरच फायलिंग हा क्रम सजगपणे पाळण्याइतकी प्रगल्भता आता 6.0 मध्ये आहे. हा क्रम न पाळल्यामुळे (GSTR1 अपलोड करण्याआधीच चुकून फाइल केल्यामुळे) निल् रिटर्न्स तयार होतात. तो धोका आता नाही.
- GSTR1 चा TXPD सेक्शन आता अधिक विस्तृत व अचूक माहिती दर्शवतो. आपण काहीही न करताही रकमा अचूकपणे जुळवून घेतल्या जातात.
- F3 (कंपनी) ची सोय वापरुन एका कंपनीतले B2B सेल्स इनवॉइस आता सुरळीतपणे दुसऱ्या कंपनीत घेता येतात. इथून पुढे असे इनवॉइसेस, GSTR1 व 3B मध्ये डुप्लीकेट व्हॉऊचर्स म्हणून दिसणार नाहीत.
- TallyPrime चा GSTR 3B आता Excel Offline Utility Version 5.4 ला आधारभूत मानून तयार होतो. ITC संबंधित माहिती त्या त्या पोटविभागाप्रमाणे दिसेल. पूर्वी ही माहिती सेक्शन 3.1.1 च्या ई–कॉमर्स रकान्याखाली दिसत असे.
- बँक खात्यातील URD प्रकारच्या एंट्रीज तसेच करमुक्त खर्चाची खाती (एक्झ्म्प्ट एक्सपेन्सेस लेजर्स) आता GSRR 3B मध्ये योग्य प्रकारे दिसतील. आधी या सर्वच एंट्रीज Uncertain Transactions मध्ये जात असत.
- नगानुसार सेस (सेस ऑन क्वांटिटी) लावताना राऊंड ऑफ आणि दशांशामधील किंमती (डेसिमल वॅल्यू) आता बिनचूकपणे त्या एंट्रीमध्येच घेतल्या जातील. याआधी अशा प्रकारच्या एंट्रीज मिस मॅच किंवा इनकरेक्ट टॅक्स अमौन्ट म्हणून दाखवल्या जात.
- e-Invoice किंवा e-Way Bill – यापैकी एक पोर्टल चालू नसेल तरी TallyPrime च्या मदतीने तुम्ही e-Invoice व e-Way Bill निर्वेधपणे बनवू शकता.
TDS ची रक्कम निर्वेधपणे निश्चित करा
ट्रानजॅक्शन लेवलला जेव्हा TDS च्या रकमा बदलल्या/ सुधारल्या जातात, त्या आता अचूक आणि सविस्तर स्वरूपात दिसतील. याआधी TDS च्या रकमा बदलल्या गेल्या तर Dr/Cr आणि TDS लेजरमध्ये अडचणी येत असत.
VAT रिपोर्ट मध्ये सुधारणा
भारतातील सर्व राज्यांचा व केंद्रशासित प्रदेशांचा वॅट रिपोर्ट आता अचूक मिळेल. यापूर्वी खालील राज्ये व केंद्रशासित प्रदेशांसाठी तो येत नव्हता – पुदूच्चेरी, हरयाणा, तेलंगणा, चंडीगड, दादरा–नगर–हवेली, दीव-दमण, केरळ, लडाख, सिक्कीम, त्रिपुरा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल.