Explore Categories

 

 PDF

TallyPrime आणि TallyPrime Edit Log Release 5.1 साठी Release Notes| नवीन वैशिष्ट्ये!

करविषयक सर्व गोष्टींची प्रभावी पूर्तता करून तुमच्या व्यवसायाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी  Tally Prime Release 5.1 हे मोठेच वरदान आहे.

  • GST चे सुलभीकरण – एकगठ्ठा पद्धतीने B2B चे B2C मध्ये रूपांतर, मास्टर्स- ट्रान्झॅक्शन्स मधील विसंगतीचे निराकरण, वेगवेगळ्या कालावधीसाठी असलेल्या वेगवेगळ्या GSTR1 ची सुटसुटीत हाताळणी, e-way बिलाची सुधारित मांडणी.
  • व्हाऊचर नंबरींगचे विविध पर्याय. याच बरोबर कॉन्फिगर करण्याजोगी HSN/SAC समरी.
  • करनिर्धारणाची नवीन पद्धती (New Tax Regime) आधारभूत मानून तयार केलेला पे-रोल (अद्ययावत FVU चा वापर)
  • टॅली प्राइम मधून थेट घेता येणाऱ्या संदर्भामुळे, DIY Support म्हणजे आता तुमच्या हाताचा मळ
  • अरेबिक भाषेतील मांडणी आणि छपाई आता अधिक स्पष्ट व अधिक अर्थवाही

GST संबंधातील (मास्टर्स व ट्रान्झॅक्शन्स लेव्हल वरील) विसंगतीचे सोप्या पद्धतीने निराकरण

Tally Prime Release 5.1 च्या मदतीने आता तुम्ही GST संबंधातील (मास्टर्स व ट्रान्झॅक्शन्स लेव्हल वरील) विसंगतीचे सोप्या पद्धतीने निराकरण करु शकता. ह्या विसंगती सहजपणे शोधा आणि सुरळीत  GST पूर्तता ही तुमची ओळख बनवा. त्याच बरोबर तुमचा डेटा बिनचूक व अद्ययावत राहील ह्याची खात्री बाळगा.

व्हाऊचर नंबरिंग मधील सुधारणा व HSN/SAC Summary मधील सुधारणा

Tally Prime Release 2.1 मधून Tally Prime Release 5.1 मध्ये येताना, व्हाऊचर नंबरिंग साठी खालील पर्याय उपलब्ध होतात (हे पर्याय – Migrate Company Data ह्या सदरांखाली दिसतात)

व्हाऊचर नंबरिंग सध्याची पद्धती सुरू ठेवणे.

निवडक विभागांसाठी पद्धत (उदा. फक्त सेल्स व्हाऊचर साठी) बदलणे.

HSN/SAC Summary

F12 बटणाचा उपयोग करून आपल्याला हवी तशी HSN/SAC Summary बनवता येते (B2C ला वगळता येते)

HSN/SAC नंबर हा चार/ सहा/ आठ आकडी ठेवता येतो.

कालविविध जीएसटी रिटर्न्स – (Multiperiod GSTR1) आता एकाच एक्सेल फाइल मध्ये.

वेगवेगळ्या GST Returns चा कालावधी वेगवेगळा असू शकतो. उदा. मासिक/ त्रैमासिक इत्यादी – हे सर्व GST Returns आता एकाच Excel File मधून भरता येतील. तसेच एकाच कंपनीचे वेगवेगळे GST नंबर असतील (वेगवेगळ्या राज्यात शाखा असल्यास असे असू शकते) तर रिटर्न भरतांना एक GST नंबर आपण निवडू शकता जेणेकरून फक्त त्याच कंपनीचे GSTR1 भरले जाईल किंवा सर्व कंपन्यांचे रिटर्न्स एकाच वेळीही भरू शकता.

वार्षिक करपत्रकात HSN/SAC Summary

एकसंध स्वरूपात HSN/SAC Summary आता Annual Computation Report मध्ये उपलब्ध आहे. ही Summary आपण कालावधीनिहाय (Period wise) बघू शकता.

B2B लेजर्सचे एकगठ्ठा B2C मध्ये रूपांतर

GST Registration रद्द झाल्यामुळे वा केल्यामुळे काही लेजर्स B2B मधून काढून B2C मध्ये टाकावी लागतात. 5.1 मध्ये हे काम एकगठ्ठा स्वरूपात केले जाते.

विसंगत व्हाऊचर चा प्रश्न सोडवला गेला आहे

या आधी विसंगत व्हाऊचर्सना Accept as it is म्हंटले तरी ते व्हाऊचर uncertain transaction मध्ये जाऊन पडत असे – कोणताही बदल न होता – आता मात्र ते व्हाऊचर योग्य प्रकारे घेतले जाईल. या प्रक्रियेत त्या व्हाऊचरचे मूळ status बदलणार नाही याचीही काळजी घेतली जाईल.

सर्व्हिस लेजर्स मध्ये अचूक GST

या आधी सर्व्हिस लेजर्स मध्ये GST निश्चित करतांना काही त्रुटी रहात होत्या. 5.1 मध्ये ह्या त्रुटींचे निराकरण करण्यात आले आहे. आता सर्व्हिस लेजर्स मध्ये GST ची रक्कम बरोबर असल्याची आपण खात्री बाळगू शकतो.

GST2A, 2B व 3B मधील बँक चार्जेसच्या अपवादा‍त्मक मांडणीवर तोडगा

बँक चार्जेस जर GST लावून घेतले तर यापूर्वी GSTR2A, 2B व 3B ला त्रुटी यायच्या कारण बँक लेजर हेच मूलत: Unregistered/consumer म्हणून घेतले जात असे. आता मात्र Transaction Level वर याला तोडगा काढला गेला आहे.

GST च्या नियमांचे अधिक अचूक पालन करण्यासाठी केलेले बदल.

गहाळ झालेली व्हाऊचर सादर करण्यासाठी किंवा ITC चा दावा करण्यासाठी खालील पैकी जी तारीख/ दिवस आधी येईल ती आधार भूत समजावी.

  • पुढील आर्थिक वर्षाचा नोव्हेंबर महिना
  • चालू आर्थिक वर्षापासून 20 महीने
  • वार्षिक कर पत्रक भरणे.

खालील पैकी जी तारीख/ दिवस आधी येईल ती विक्रीशी संबंधित क्रेडिट नोट साठी आधारभूत मानावी.

  • पुढील आर्थिक वर्षाचा नोव्हेंबर महिना
  • वार्षिक करपत्रक भरणे.

Advance Receipts/ Payments सामावून घेणारी नवी लवचिक व्यवस्था

आधी Advance Receipts/ Payments फक्त 18 महिन्यापर्यंतच सामावून घेतले जात असत आता मात्र यासाठी कोणतीही मर्यादा नाही. 

सुधारित GSTR2B शी संलग्न Reconciliation

कर पात्र रक्कम (Taxable Amount) व कराची रक्कम (Tax Amount) यांची, दराप्रमाणे तुलना करून  Reconciliation करण्याची या आधी पद्धत होती आता मात्र GSTR2B च्या सुधारित आवृत्तीनुसार एकत्रित कर रकमेवर आधारित Reconciliation होईल

GST Registration Masters ची सुधारित व्यवस्था

बहुविध GST नोंदणीवाली कंपनी (Multi registration) असेल तर एक अडचण पूर्वी प्रकर्षाने जाणवत असे. Transactions काढून टाकल्यानंतरही GST Registration मास्टर्स काढता येत नसत. ही त्रुटी आता सोडवली गेली आहे.

सुस्पष्टपणे नावे दिलेली बटणे (जास्त चांगल्या आकलनासाठी)

GSTR1, CMP-08, GSTR3B, eWay Bill eInvoice Upload preview रिपोर्ट मध्ये आता “send” ऐवजी “send (online)” आणि “export” ऐवजी “export (offline)” अशी बटणे दिसतील. ऑनलाइन आणि ऑफलाइन व्यवहारांची यामुळे योग्य प्रकारे विभागणी होईल.

GSTR1 रिपोर्ट मध्ये अचूक वर्गीकरण

जर Debit Note किंवा Credit Note चे रूपांतर अनुक्रमे सेल्स किंवा Purchase मध्ये केले तर यापूर्वी ह्या एंट्रीज Credit/ Debit Note मध्येच दिसत रहात. 5.1 मध्ये ही त्रुटी सोडवली गेली आहे. अशा एंट्रीज आता योग्य विभागात योग्य रीतीने दिसतील.

Undo filing option” ची त्रुटी सुधारली गेली आहे

यापूर्वी GSTR1 मधला “Undo filing” हा पर्याय वापरताना (GSTR1 व 3B मध्ये) एक त्रुटी होती. “One or more transactions have been modified by another user. Check the data and try again”

ही त्रुटी आता सोडवली गेली आहे.

निर्यात बिलांसाठी (Export Invoice) अचूक eWay Bill

जर ship to या सदराखाली गैर भारतीय राज्य नोंद केले गेलेले असेल व भारतीय बंदराचा पिन  कोड नसेल तर या प्रकारची बिले पूर्वी टॅलीत स्वीकारली जात नसत. आता ही त्रुटी सुधारली गेली आहे. आता निर्यात बिलांसाठी eWay Bill व eInvoice तयार करता येतो. – योग्य ते भारतीय राज्य व भारतीय बंदराचा पिन कोड दिला की झाले.

Material in and Material out साठी eWay Bill

Material in व Material out या दोन्ही साठी आता eWay Bill तयार होऊ शकते. मुख्य उत्पादक व जॉब वर्क करणारी व्यक्ती (ठेकेदार) यांच्यात मालाची देवाण घेवाण सतत सुरु असते. या प्रसंगांमधे या वैशिष्ट्याचा उपयोग होऊ शकतो.    

पगारपत्रकाची सुधारित अंमलबजावणी

प्रोटीएन डिपार्टमेंट कडून  FVU tool version 8.6 प्रक्षेपित केले गेलेले आहे यामध्ये e-Returns साठी एक विहित नमुना दिला गेलेला आहे. 5.1 च्या मदतीने पगाराचे अंदाजे विवरण तसेच वजावटीचे आकडे थेट Payroll IT eTDS मध्ये टाकले जाऊ शकतात.

करनिर्धारणाच्या नव्या व्यवस्थेला सामावून घेणारी Payroll IT eTDS.txt फाइल

यापूर्वी PF ची रक्कम  Payroll IT eTDS.txt मध्ये घेतली जात असे (करदात्याने नवी व्यवस्था किंवा जुनी व्यवस्था – कोणतीही निवडली तरी ह्यात बदल होत नसे) आता मात्र कर्मचाऱ्याने नवी व्यवस्था स्वीकारली असेल तर PF ची रक्कम वगळली जाते –  FVU मधील योग्य त्या बदलांमुळे हे शक्य होते.

नव्या कर व्यवस्थेमध्ये विशिष्ट वजावटींना वगळणे

या पूर्वी व्यवसाय कर व Chapter VI-A वजावटी या  IT eTDS.txt या फाइल मध्ये अंतर्भूत केल्या जात जरी नवी कर व्यवस्था (New Tax Regime) निवडली असली तरी. आता मात्र अशा वजावटी वगळल्या जातात.

व्हाऊचरचे स्वरूप व छपाई मध्ये सुधारणा

या पूर्वी rate  (inclusive of tax) चा कॉलम display mode मध्ये गायब होत असे ही त्रुटी आता सोडवली गेली आहे.

सुधारित DIY Support/ प्राथमिक स्वरूपाचे Licensing issues आणि आपले ज्ञान यातील दरी दूर करणाऱ्या सोप्या युक्त्या.

Licensing issues सोडवणे आता झाले सोपे!

Get Help चे बटन दाबा आणि Tally Help कडून सोपी सोपी उत्तरे मिळवा – इंग्लिश व हिन्दी ह्या दोन्ही भाषातून. या खेरीज GSTR1, GSTR3B, CMP-08 च्या “Upload Preview Reports” मध्ये एक नवी छोटी चौकट (info) दिली गेली आहे ज्यायोगे Tally Help संबंधी सूचना व व्हिडिओ चुटकी सरसे सादर होतील.

तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला आम्हाला आवडतील. जर तुम्हाला त्या सूचना उपयुक्त वाटल्या तर हे बटन दाबा (जे Tally Help च्या स्क्रीनच्या तळाशी आहे) आणि आपल्या सूचना/ विचार तिथे लिहा. तुमच्या प्रतिक्रियांमुळे तुम्हाला जास्त चांगली सेवा देण्यास आम्हाला मदत होईल. धन्यवाद.

“Stock Item Additional Description” आता सुधारित दृश्य स्वरूपात

या आधी “Stock Item Additional Description” वाचायला फार अवघड जात असे कारण ते आकुंचित, मुडपलेल्या (compressed) स्वरुपात येत असे. यावर उपाय म्हणून 5.0 मध्ये हे description छापण्यासाठी जास्त जागा दिली गेली पण त्यामुळे पृष्ठसंख्या वाढू लागली 5.1 मध्ये ही समस्या सोडवली गेली आहे. इथून पुढे Additional Description हे एकाच ओळीत छापले जाईल. यामुळे बिलातील “Description of Goods” या विभागाचा पर्याप्तपणे उपयोग केला जाईल, ज्यायोगे सुवाच्यता व जागेचा कल्पकपणे वापर या दोन्ही गोष्टी साध्य होतील.

Bilingual Invoice Format 2 मध्ये सौदी रियालचे योग्य स्थान

यापूर्वी Bilingual Invoice Format 2 मध्ये सौदी रियाल हे अरेबिक भाषेत लिहिलेल्या रकमेच्या आधी छापले जात असे. आता ते रकमेनंतर छापले जाईल. सौदी अरेबिया मधल्या प्रचलित पद्धतीप्रमाणे ही व्यवस्था आहे.

सेल्स बिलामध्ये रकमेच्या शेजारी Fakat दिसतात

अरेबिक भाषेत असलेल्या Sales Voucher for Single – Arabic – Format 1 & Format 2 मध्ये यापूर्वी “Fakat” दिसत नसे. आता ही समस्या सोडवली गेली आहे. आता रकमेच्या शेजारीच Fakat दिसेल.

“अक्षरी रक्कम” आता अरेबिक भाषेत दिसेल व छापली जाईल.

यापूर्वी भाषेचा कोणताही पर्याय निवडलेला असला तरी “अक्षरी रक्कम” ही इंग्लिश मध्ये दिसायची व छापली जायची. 5.1 पासून अशी सुधारणा करण्यात आली आहे की अरबी भाषेचा पर्याय निवडलेला असेल तर अक्षरी रक्कम अरेबिक मध्ये दिसेल व छापली जाईल.

“Display Language” मध्ये आता अरेबिक दिसणार

या पूर्वी “Display Language” या सदरात अरेबिकचा उल्लेख Arabic (Soudi Arabia) असा होत असे. 5.1 पासून हा उल्लेख फक्त अरेबिक असा होईल.

TallyHelpwhatsAppbanner
Is this information useful?
YesNo
Helpful?
/* */