HomeTallyPrimeWhat's New | Release NotesRelease 4.0 - मराठी

 

Explore Categories

 

 PDF

TallyPrime आणि TallyPrime Edit Log Release 4.0 साठी रिलीज नोट्स | जाणून घ्या नवीन काय आहे!

TallyPrime आणि TallyPrime Edit Log Release 4.0 हे पुढील गोष्टी जाणून घेण्यास तुम्हाला भरपूर मदत करणार आहे. त्यामूळे नक्कीच तुमचा आनंद आणि उत्साह द्विगुणित होइल. 

  • व्हाउचर आणि रिपोर्ट यासारखे तुमचे व्यावसायिक लेख WhatsApp द्वारे क्षणार्धात शेअर करण्याची सुविधा
  • MS Excel फॉरमॅटमध्ये तयार केलेले मास्टर्स आणि transactions import करण्याचा सोपा मार्ग.
  • अत्याधुनिक Dashboard जो तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या स्थितीची झटपट झलक देतो

याव्यतिरिक्त, GST आणि Payment Request यांसारख्या विभागांमध्ये सुधारणा करण्यासाठी सोप्पे मार्ग तसेच इनव्हॉइसमध्ये previous आणि current balances print करण्याची सुविधा आणि इतर अनेक सुधारणा करण्याची संधी TallyPrime मध्ये उपलब्ध आहे. ज्यामुळे तुमचा कामाचा ताण हलका होऊ शकतो. 

मुख्य आकर्षण – TallyPrime आणि TallyPrime Edit Log Release 4.0

TallyPrime Release 4.0 नवीन आणि उपयुक्त वैशिष्ट्यांसह तुमच्यासाठी उपलब्ध आहे. जे तुमच्या कामाचा अनुभव आणखी आनंददायक बनवेल.

  • बिझनेससाठी TallyPrime WhatsApp 
  • MS Excel मधूनडेटा इम्पोर्ट करण्याची सुविधा 
  • ग्राफिकल Dashboard

व्यवसाय तपशीलांची त्वरित शेअरिंग | TallyPrime उपलब्ध आहे WhatsApp for Business साठी 

व्यवसाय आणि स्टेकहोल्डर यांच्यातील अखंड आणि कार्यक्षम संवादाचे महत्त्व लक्षात घेऊन, TallyPrime Release 4.0 हे WhatsApp for Business वर उपलब्ध झाल्याने झटपट संवाद करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. हा पर्याय मार्केटमध्ये राज्य करणाऱ्या कम्युनिकेशन तंत्रज्ञानातील नवीन प्रगती आणि अनुभवात सुधारणांचा लाभ घेण्यास मदत करते.

व्यवसाय आता TallyPrime वरून एका क्लिकवर एकाधिक ग्राहकांना किंवा स्टेकहोल्डर्सना एका क्लिकवर कागदपत्रे पाठवू शकता. समजा तुम्ही नुकतीच तुमची पुस्तके तिमाहीसाठी बंद केली आहेत. तुम्ही तुमच्या गुंतवणूकदारांना आणि स्टेकहोल्डर्सना WhatsApp वर डिजिटल स्वाक्षरी केलेली आर्थिक स्टेटमेंट पाठवू शकता. त्याचप्रमाणे, तुम्ही तुमच्या ग्राहकांना व्हॉट्सअॅपवर invoices आणि रिमाइंडर लेटर्स पाठवून त्यांच्याकडून WhatsApp द्वारे फीडबॅक मिळवू शकता. हे रोख मिळकतीच्या प्रवाहाचे व्यवस्थापन करण्यात मदत करेल. 

तुमच्या देशांतर्गत ग्राहकांना WhatsApp द्वारे पाठवलेल्या इन्व्हॉइसेस वा रिमाईंडर लेटर्स वरील पेमेंट्स URLs ला क्लिक करून त्वरित पेमेंट्स करण्याची सुविधा मिळतेय.

WhatsApp आता TallyPrime सोबत संपूर्ण इंटिग्रेटेड झाले आहे. तुम्ही थेट व्यवसायासाठी TallyPrime वरून WhatsApp च्या माध्यमातून साइन अप करू शकता आणि एकाच वेळी एक किंवा अधिक ग्राहकांना आणि स्टेकहोल्डरना कागदपत्रे पाठवू शकता. म्हणजे तुम्हाला काळजी नसेल कारण WhatsApp च्या सुविधेमुळे तुम्हाला ई-मेल पाहण्याची किंवा त्यावर काम करण्याची गरज भासणार नाही.

कोणत्याही सॉफ्टवेअरमधून TallyPrime वर सहज माइग्रेशन | MS Excel वरून डेटा Import करा

खूप जास्त डेटा मॅन्युअली एंटर करणे हे व्यवसाय करणाऱ्यांसाठी वाईट अनुभव देणारे आहे. एंट्री मॅन्युअली करण्यासाठी वेळ लागतो आणि चुका होऊ शकतात. याचे निराकरण करण्यासाठी, TallyPrime Release 4.0 तुम्हाला MS Excel वरून डेटा अखंडपणे इम्पोर्ट करण्याची सुविधा उपलब्ध करते. आधीच्या इम्पोर्ट XML फाईल्स व्यतिरिक्त हा अजून एक पर्याय असेल

तुम्ही अनुभवलं असेलच की, अनेक सॉफ्टवेअर प्रोडक्ट्स तुम्हाला Excel मध्ये डेटा एक्सपोर्ट करण्याची परवानगी देतात. हे तुम्हाला तुमचा डेटा Excel workbook मध्ये आणण्यास आणि TallyPrime मध्ये इम्पोर्ट करण्यास मदत करते.

वैशिष्ट्य जाणून घ्या:

  1. Excel वरून सहजतेने मास्टर्स आणि ट्रान्झॅक्शन्स इम्पोर्ट करा.
  2. कोणतेही डीफॉल्ट टेम्पलेट किंवा sample Excel files वापरू शकता. 
  3. कोणत्याही स्वरूपात किंवा क्रमाने Excel workbook मध्ये तयार केलेला डेटा TallyPrime च्या fields शी मॅप करू शकता. 
  4. इम्पोर्ट करताना तयार केलेल्या लॉगमधून इम्पोर्ट करते वेळी येणाऱ्या त्रुटी ओळखू शकता.

आर्थिक माहिती तयार करण्यासाठी व्हिज्युअल टूल | ग्राफिकल Dashboard

TallyPrime मध्ये तुम्ही व्यवसाय माहितीचे बौद्धिक स्वरुपात विश्लेषण करण्यासाठी डॅशबोर्ड वापरू शकता. Default नुसार प्रदान केलेल्या विक्री आणि खरेदी डॅशबोर्ड व्यतिरिक्त, तुम्ही आणखी डॅशबोर्ड तयार करू शकता. तुमच्या गरजांनुसार, तुम्ही वेगवेगळ्या रिपोर्ट्ससाठी वेगवेगळ्या tiles जोडू शकता. विविध माहिती कॅप्चर करण्यासाठी प्रत्येक tile कॉन्फिगर करू शकता आणि प्रत्येक tile चा गरजेनुसार वापर करू शकता. तुम्ही व्यवसाय मालक, वित्त व्यवस्थापक किंवा सल्लागार असाल तरीही, Dashboard तुम्हाला डेटा-आधारित निर्णय घेण्याचे सामर्थ्य देतो ज्यामुळे वाढ आणि यश मिळते. तुम्‍ही तुमच्‍या कॅश फ्लोचे निरीक्षण करण्‍यासाठी, कमाईचा ट्रेंड ट्रॅक करण्‍यासाठी, खर्चाचे नमुने विश्‍लेषित करण्‍यासाठी आणि तुमच्‍या निवडीच्‍या पिरेडसाठी तुमच्‍या आर्थिक स्‍थितीचे आणि लेजर बॅलन्सेसचे सर्वसमावेशक दृश्‍य मिळवण्‍यासाठी तुम्‍ही वेगवेगळ्या tiles मध्‍ये ग्राफ्स/चार्ट्स वापरू शकता.

TallyPrime चा डॅशबोर्ड खालील गोष्टींसाठी लवचिकता प्रदान करतो:

  1. Tiles ऍड करा किंवा hide करा. प्रत्येक tile स्वतंत्रपणे कॉन्फिगर करा. डेटा पॉइंट समाविष्ट करा किंवा वेगळे करा इ.
  2. वापरकर्त्यांना त्यांच्या अधिकारांवर आधारित dashboard वरून प्रतिबंधित करा. विशिष्ट वापरकर्त्यांनी विशिष्ट tiles वर प्रवेश प्रतिबंधित केला असल्यास, अशा tiles त्या वापरकर्त्यांसाठी डॅशबोर्डचा भाग होणार नाहीत.
  3. तुम्ही वेगवेगळ्या उद्देशांसाठी वेगवेगळे dashboards तयार करू शकता, तुम्हाला हवे तसे tiles व्यवस्थित करू शकता आणि व्ह्यूज सेव्ह करू शकता.
  4. जेव्हा तुम्ही एखादी Company उघडता तेव्हा, Dashboard होम स्क्रीन म्हणून लोड करा.
  5. तुम्ही प्रिंट किंवा एक्सपोर्ट करुन ईमेल आणि WhatsApp द्वारे स्टेकहोल्डर्सना पाठवू शकता. 

TallyPrime and TallyPrime Edit Log Release 4.0 – प्रोडक्ट मध्ये सुधारणा करण्यासाठी 

इनव्हॉइसमध्ये Previous आणि Current Balances प्रिंट करणे

प्रिंट करताना आवश्यकतेनुसार Previous आणि Current Balances असलेल्या इनवॉइस प्रिंट करू शकता. जेणेकरून अचूक परिणाम तुम्हाला निरदर्शनास येतील. 

QRMP व्यापाऱ्यांसाठी एकाच JSON फाइलमध्ये एक तिमाही GSTR-3B निर्यात करण्याची सुविधा

QRMP व्यापारी आता एकाच JSON फाईलमध्ये एक तिमाही GSTR-3B निर्यात करू शकतात आणि नंतर GSTR-3B फाइल करण्यासाठी GST पोर्टलवर अपलोड करू शकतात.

GSTR-3B च्या Input Tax Credit Available विभागात पार्टीचा GSTIN/UIN

जेव्हा तुम्ही Input Tax Credit Available विभागात जाऊन party-wise व्हॉउचर्स बघता, तेव्हा तुम्ही पार्टीचा GSTIN/UIN देखील पाहू शकाल.

TallyPrime मधून TallyEdge एक्सप्लोर करा

TallyEdge एक्सप्लोर करणे – तुमचे गो-टू अकाउंट अग्रीगेटर – आता आणखी सोपे झाले आहे, कारण तुम्ही ते TallyPrime मधील Exchange मेनूद्वारे त्याचा वापर करू शकता.

TallyPrime वरून TallyPrime Powered by AWS एक्सप्लोर करा

TallyPrime Powered by AWS एक्सप्लोर करणे आता एकदम सोपे झाले आहे, कारण त्यासाठी तुम्हाला टॅलीप्राईममधील Help मेनूमधून जाणून घेऊ शकता.

RCM मध्ये  GST लेजर्स आणि Unregistered Dealers सोबत केलेल्या ट्रांसक्शन्स 

तुम्ही आता RCM पर्चेस व्हाउचर्समध्ये GST लेजर्स आणि URDs मधून केलेली खरेदी ऍड करू शकता आणि खात्री बाळगा की हे व्हाउचर्स रिटर्नमध्ये समाविष्ट केले जातील.

नवीन FVU Tool 8.2  नुसार TDS आणि TCS रिटर्न्स Export करण्याची सुविधा

तुम्ही आता नवीन FVU Tool 8.2 वर आधारित खालील रिटर्न रिपोर्ट्स एक्सपोर्ट करू शकता:

  • Salary टी डी एस फॉर्म -24Q
  • टी डी एस फॉर्म -26Q
  • टी डी एस फॉर्म-27Q
  • टी सी एस फॉर्म -27EQ

GSTR-1 Document Summary मध्ये कॅन्सल्ड व्हॉउचर्सची संख्या

जेव्हा तुम्ही एक किंवा अधिक सेल्स इन्वॉइसेस कॅन्सल करता, तेव्हा सर्व महिन्यांसाठी कॅन्सल्ड वॉचर्सची संख्या देखील GSTR-1 Document Summary मध्ये समाविष्ट केली जाईल. 

GST Rate Override केल्यानंतर GST रकमेचे अपडेट

GST Rate override केल्यानंतर सुद्धा GST रकमेचे व्हॉउचर्स मध्ये अमाऊंट अपडेट होण्याचे निश्चित केले जाईल.

जरी तुम्ही Use common ledger for item allocation configuration हा पर्याय No वर सेट केला असला तरीही तुम्ही GST Rate अखंडपणे override करू शकाल आणि GST रक्कम अपडेट केली जाईल.

Job Work Out Orders मध्ये Company GSTIN/UIN प्रिंट करण्याची सुविधा

GSTIN/UIN आता Job Work Out Orders मध्ये प्रिंट होईल.

  1. एकापेक्षा अधिक GST रेजिस्ट्रेशन्सच्या बाबतीत, GST रजिस्ट्रेशन (व्हाउचर तयार करताना निवडलेला) आणि State Code प्रिंट केला जाईल.
  1. एक GST रजिस्ट्रेशनच्या बाबतीत, तुम्ही More Details द्वारे GSTIN/UIN आणि State Code तपशील एन्टर करू शकता आणि ते प्रिंट देखील करू शकता.

GSTR-1 HSN Summary च्या एक्सपोर्ट केलेल्या MS Excel आणि CSV फाईल्समधील Total Value Field

MS Excel किंवा CSV वर GSTR-1 HSN Summary एक्सपोर्ट करण्याच्या कामाचा अनुभव आता अजून चांगला मिळणार आहे. 

जरी तुम्ही GSTR-1 HSN Summary MS Excel किंवा CSV फाईलमध्ये एक्सपोर्ट केली तर तुम्हाला GST रकमेसह Total Value फील्ड दिसेल.

GSTR-3B च्या Nature View तील काही transactionची Taxable आणि Tax ची रक्कम दुप्पट झाली आहे

पूर्वी, जेव्हा ट्रान्झॅक्शन दोन वेगवेगळ्या विभागांमध्ये समाविष्ट केले जात होते, तेव्हा Taxable आणि Tax Amount दुप्पट केली जात होती.

Nature View मध्ये GSTR-3B पाहणे अधिक चांगले झाले आहे कारण आता तुम्हाला योग्य असलेली Taxable आणि Tax रक्कम दिसेल.

GSTR-3B मध्ये सेवांच्या इम्पोर्टसाठी व्हॉउचर्स तयार केले आहेत

सेवांच्या इम्पोर्टसाठी बनवलेले व्हॉउचर्स, जे टैक्स सूट देणारे आहेत, आता 4 A. Input Tax Credit Available मध्ये समाविष्ट केले जातील आणि 3.1d. Inward Supplies (applicable for Reverse Charge) विभागाचा भाग नसणार.

इतर सॉफ्टवेअरमधून डेटा इम्पोर्ट केल्यानंतर GSTR-1 चे सहज एक्सपोर्ट शक्य 

तुम्ही इतर कोणत्याही सॉफ्टवेअरमधून डेटा इम्पोर्ट केला असला तरीही, TallyPrime वरून GSTR-1 एक्सपोर्ट आता सहजपणे होईल.

मालाचे Bill of Entry No. समान असलेले परचेस वॉचर्स

आता तुम्ही समान Bill of Entry No. चा वापर करून एकाधिक परचेस व्हॉउचर्स तयार करू शकता आणि हे transaction रिटर्न्स मध्ये समाविष्ट केले जातील.

UoM लागू होत नसेल तर GST पोर्टलवर व्हाउचर अपलोड करा

यूनिट ऑफ़ मेज़रमेंट नसलेल्या स्टॉक आयटमसाठी तुम्ही आता खालील सुविधांसह व्हॉउचर्स पोर्टलवर अपलोड करू शकता:

  • वस्तूंसाठी तयार केलेले व्हॉउचर्स साठी UoM OTH असे दाखवले जाईल.
  • सेवांसाठी बनवलेल्या व्हॉउचर्स साठी UoM NA असे दाखवले जाईल.

GST डेटासह वॉचर्सची सुरळीत निर्मिती

GST संबंधित माहितीसह व्हॉउचर तयार करणे आता अधिक सोपे झाले आहे, कारण व्हॉउचर तयार करताना तुम्हाला आव्हाने आणि त्रुटींचा सामना करावा लागणार नाही.

ODBC द्वारे एक्सपोर्ट केलेल्या Excel फाइलमधील HSN/SAC, डिस्क्रिप्शन आणि पार्टी GSTIN

HSN/SAC, डिस्क्रिप्शन आणि पार्टी GSTIN, ODBC द्वारे एक्सपोर्ट करताना MS Excel फाइलमध्ये नसायचे.

ही समस्या आता सोडवली आहे. 

HSN/SAC ची पर्वा करता TallyPrime चे सुरळीत चालणे 

ट्रान्झॅक्शन मधील HSN/SAC ची लांबी 1024 वर्णांपेक्षा जास्त असली तरीही जेव्हा तुम्ही GSTR-1 आणि GSTR-3B उघडता तेव्हा TallyPrime आता सुरळीत चालेल.

TallyPrime Release 4.0 वर सहज माइग्रेशन

तुम्ही खालील कारणांमुळे उद्भवलेल्या मेमरी-संबंधित अडचणींविना TallyPrime Release 2.1 किंवा त्यापूर्वीचे वापरत असल्यास कंपनी डेटा अखंडपणे TallyPrime वर मायग्रेट करू शकाल:

  • कंपनीचा डेटा प्रचंड आहे आणि व्हॉउचर्सची संख्याही जास्त आहे.
  • व्हॉउचर्समध्ये स्लॅब-आधारित दरांसह स्टॉक आयटम किंवा सर्विसेज समाविष्ट आहेत जेथे Include Expense for slab calculation कॉन्फिगरेशन सक्षम केले आहे. 

तथापि, जर तुम्ही TallyPrime Release 3.0 किंवा 3.0.1 वर काम करत असाल, तर तुम्हाला मायग्रेशनची प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही फक्त तुमचा कंपनी डेटा TallyPrime Release 4.0 मध्ये लोड करू शकता आणि तुमचे काम सुरू ठेवू शकता.

UPI द्वारे पेमेंट रिक्वेस्ट वर partial पेमेंट

तुम्ही तुमच्या ग्राहकाला UPI द्वारे पेमेंट रिक्वेस्ट पाठवता तेव्हा ते रक्कम बदलून पारशल पेमेंट करू शकतील.

कॅश लेजर ट्रान्झॅक्शन्समध्ये पेमेंट रिक्वेस्टसाठी QR कोड

जरी ट्रान्झॅक्शन कॅश लेजरने केला असेल तरी, पेमेंट रिक्वेस्टसाठी QR कोड तयार केला जाईल.

GST शिवाय कंपनीमध्ये सिंपल इनव्हॉइस फॉरमॅटमध्ये पेमेंट रिक्वेस्टचा QR कोड प्रिंट करणे

F11 (कंपनी फीचर्स) मध्ये GST सक्षम केला नसला तरीही, QR कोड सिंपल इनवॉइस फॉर्मेटमध्ये पेमेंट रिक्वेस्टसाठी प्रिंट करता येईल.

प्रिंट करण्यापूर्वी Payment Link तयार करा

जेव्हा तुम्ही व्हॉउचर्स तयार करता तेव्हा, TallyPrime तुम्हाला ते प्रिंट करण्यापूर्वी पेमेंट लिंक जनरेट करण्यास सांगेल. 

हे तेव्हा होईल जेव्हा Generate payment link/QR Code after saving voucher आणि Print voucher after saving हे वाउचर टाइप मास्टर मध्ये सक्षम असतील.

प्री-प्रिंटिंग पेमेंट लिंक मिळवणे हे सुनिश्चित करते की प्रिंटमध्ये पेमेंट लिंक आणि Payment Request साठी  QR कोड दोन्ही आहेत.

सहज e-Invoice निर्मिती

e-Invoice तयार करणे अधिक सहज झाले आहे, कारण तुम्ही खालील परिस्थितींमध्ये यशस्वीरित्या e-Invoice तयार करू शकता : 

  • इनव्हॉइसमध्ये कन्साइनी म्हणून गव्हर्नमेंट एंटीटी समाविष्टीत असते.
  • आंतरराज्यीय transaction ई-वे बिलासाठी लागू नाही.

यानंतर, जेव्हा तुम्ही वस्तू किंवा सेवांच्या विक्रीसाठी e-Invoice तयार करता तेव्हा तुम्हाला The ValDtls field is required त्रुटीचा सामना करावा लागणार नाही.

मल्टीइनवॉइस प्रिंटिंगसाठी सेल्स इनवॉइस मध्ये QR कोड

QR कोडसह मल्टी-इनव्हॉइस प्रिंटिंग आता सोप्पे झाले आहे

तुम्ही अनेक सेल्स इनवॉइस प्रिंट करता तेव्हा, सर्व इन्वॉइसेसमध्ये QR कोड असेल.

इनव्हॉइससह वे बिल प्रिंट करणे

जेव्हा तुम्ही इनव्हॉइसमध्ये F12 कॉन्फिगरेशनमध्ये ई-इनव्हॉइससह ई-वे बिल प्रिंटिंग अधिकृत केले जाते, तेव्हा कॉन्फिगरेशन फक्त एका इन्व्हॉइससाठी लागू होते.

आता हे कॉन्फिगरेशन सर्व इनव्हॉइसेसवर लागू केले जाईल, जरी तुम्ही TallyPrime बंद केलं किंवा दुसरी कंपनी लोड केली तरीही.

क्लायंट कंप्यूटरवर काम करताना डिलिव्हरी नोट्समध्ये ऑर्डर क्रमांक निवडणे

मल्टी-यूजर एनवायरनमेंटमध्ये क्लायंट कंप्यूटरवर डिलिव्हरी नोट्स तयार करताना पार्टी ऑर्डर क्रमांक निवडण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागतो.

परफॉर्मन्स सुधारल्यामुळे तुम्ही आता एका क्षणात ऑर्डर क्रमांक निवडण्यास सक्षम असाल.

ब्राउझरवरून डाउनलोड केलेल्या सेल्स इन्वॉइसेसचे शीर्षक

तुम्ही ब्राउझरवरून सेल्स इनवॉइस डाउनलोड केल्यावर, इनव्हॉइसचे शीर्षक हे टॅक्स इनव्हॉइसवरून बिल ऑफ सप्लायमध्ये बदलते.

सेल्स इनव्हॉइसचे ब्राउझरवरून डाThe title of the Sales Invoice will now be retained as Tax Invoice, when you download it from a browser.ऊनलोड केल्यानंतरही शीर्षक टैक्स इनवॉइस तसेच राहणार आहेत.  

₹ 7,00,000 ते ₹ 7,27,777 च्या दरम्यान टैक्सेबल उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी Marginal Tax Relief

Marginal Tax Relief आता फक्त त्या कर्मचाऱ्यांना लागू होईल जे New Tax Regime अंतर्गत आहेत आणि ज्यांचे करपात्र उत्पन्न ₹ 7,00,000 आणि ₹ 7,27,777 दरम्यान आहे.

सबग्रुप अंतर्गत तयार केलेल्या लेजरसह इनवॉइसमध्ये GCC VAT चे तपशील

जेव्हा तुम्ही सब-ग्रुप अंतर्गत तयार केलेले लेजर वापरले, जसे की फिक्स्ड एसेट्स, GCC VAT चे तपशील गहाळ झाले होते.

तुम्हाला आता GCC VAT तपशिलांसह इनवॉइस तयार करण्याचा अखंड अनुभव असेल कारण आता लेजर किंवा सब-ग्रुप काहीही असले तरी GCC VAT चे तपशील राखले जातील.

TallyHelpwhatsAppbanner
Is this information useful?
YesNo
Helpful?
/* */