HomeTallyPrimeWhat's New | Release NotesRelease 4.1 - मराठी

 

Explore Categories

 

 PDF

TallyPrime आणि TallyPrime Edit Log Release 4.1 साठी Release Notes| नवीन वैशिष्ट्ये!

TallyPrime आणि TallyPrime Edit Log Release 4.1 यांना खालील ऑफर्स देताना खूप आनंद होत आहे:

• कंपनी आणि तिच्या MSME सप्लायर्ससाठी MSME Udyam number अपडेट करण्याची सुविधा. तुम्ही MSME सप्लायर्सचे न भरलेल्या सर्व बिलांचे तपशील पटकन गोळा करू शकता आणि आयकर कायद्याच्या section 43b(h)चे सहजपणे पालन करू शकता.

• GSTR-1मध्ये सादर केलेल्या बदलांनुसार, रिटर्नच्या कालावधीत सर्व ऑनलाइन विक्रीची यादी तयार करण्याची सुविधा.

एमएसएमइ(MSME) 

नवीन MSME वैशिष्ट्यासह, MSMEs आणि MSMEs सह व्यापार करणारे व्यवसाय हे दोन्ही MSME चे स्टेटस बघू शकतात आणि वेळेवर पेमेंट्ससाठी पेंडिंग बिल्स ट्रॅक शकतात. शिवाय, MSMEs मधील खरेदीदार थकीत MSME  पेमेंटच्या संपूर्ण तपशीलांसह त्यांचा Form MSME 1 त्वरित दाखल करू शकतात. आयकर कायद्याच्या 43b(h) चे पालन करण्यासाठी, खरेदीदार त्वरित बिलांची यादी तयार करू शकतो.

Registered MSME व्यवसाय हे करू शकतात:

• विभागाकडून प्राप्त झालेले UDYAM Registration चे तपशील सेट करू शकतात. ते तपशील देखील बदलू शकतात आणि लागू तारखांसह असे सर्व बदल ट्रॅक करू शकतात.

• खरेदीदारांना तुमच्या MSME status बद्दल माहिती देण्यासाठी  UDYAM Registration  तपशीलांसह इंव्हॉयसेस प्रिंट करू शकतात.

• वेळेवर पेमेंट प्राप्त करण्यासाठी देय किंवा थकीत रीसिव्हेबल्सचे तपशील पटकन मिळवून रिमाइंडर्स पाठवू शकतात.

 

MSMEs सह व्यापार करणारे व्यवसाय हे करू शकतात:

• सप्लायर्सचे MSME स्टेटस सेट करू शकतात.

• MSMEs शी संबंधित बिले ओळखून व्याज टाळण्यासाठी देय तारखेपूर्वी पेमेंट करू शकतात.

• थकीत पेमेंट असलेल्या MSMEs शी संबंधित माहिती तात्काळ मिळवून Form MSME-1 मध्ये त्याची तक्रार देऊ शकतात.

• आयकर कायद्याच्या 43b(h) नुसार परवानगी नसलेल्या डिडक्शन्सपर्यंत जाण्यासाठी MSMEs ना न भरलेल्या सर्व बिलांचे तपशील मिळवू शकतात.

इ-कॉमर्स समरी रिपोर्टद्वारे ऑनलाइन विक्रीचे तपशील

Amazon, Myntra आणि Flipkart सारख्या e-Commerce operatorsद्वारे ऑनलाइन विक्री करणाऱ्या व्यवसायांसाठी, GSTR-1 मध्ये ऑनलाइन विक्रीच्या अहवालाशी संबंधित काही बदल सादर केले आहेत.

या बदलांना समर्थन देत, TallyPrime Release 4.1 e-Commerce Summary घेऊन आली आहे, जे खालील माहिती हायलाइट करतेय:

• करपात्र मूल्ये आणि कर रकमेचे विभाजन, जसे की IGST, CGST, SGST आणि सेस

• e-Commerce operatorsसाठी GSTIN-आधारित विक्री

अशाप्रकारे, हा रिपोर्ट तुम्हाला  GST portal वर संबंधित तपशील सहजपणे भरण्यात मदत करेल.

TallyHelpwhatsAppbanner
Is this information useful?
YesNo
Helpful?